For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घाऊक महागाई दर जानेवारीत 0.27 टक्के

06:07 AM Feb 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
घाऊक महागाई दर जानेवारीत 0 27 टक्के
Advertisement

अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे दिलासा

Advertisement

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढ जानेवारीत 0.27 टक्क्मयांपर्यंत घसरली आहे. डिसेंबर 2023 मध्ये हा दर 0.73 टक्के होता. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढ एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान नकारात्मक क्षेत्रात होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये हा दर 0.39 टक्क्मयांवर सकारात्मक झाला होता. आता त्यात सुधारणा होत असून जानेवारी महिन्यात अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात राहिल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने बुधवारी एका निवेदनात स्पष्ट केले.

Advertisement

डिसेंबर 2023 मधील 9.38 टक्क्मयांच्या तुलनेत जानेवारीमध्ये अन्नधान्य चलनवाढीचा दर 6.85 टक्क्मयांवर घसरला, असे आकडेवारीवरून दिसून येते. जानेवारीमध्ये भाज्यांची महागाई 19.71 टक्के होती, जी मागील महिन्यात 26.3 टक्के होती. तर जानेवारीमध्ये डाळींच्या घाऊक महागाईचा दर 16.06 टक्के आणि फळांचा दर 1.01 टक्के होता.

Advertisement
Tags :

.