For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घाऊक महागाई दराचा 4 महिन्यातील नीचांक

07:00 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
घाऊक महागाई दराचा 4 महिन्यातील नीचांक
Advertisement

फेब्रुवारी महिन्यात 0.20 टक्क्यांवर

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

किरकोळ महागाईनंतर आता घाऊक महागाईच्या आघाडीवरही दिलासा मिळाला आहे. घाऊक महागाईचा दर फेब्रुवारी 2024 मध्ये 0.20 टक्क्मयांवर आला आहे. यापूर्वीच्या जानेवारी 2024 मध्ये हा दर 0.27 टक्के होता. घाऊक महागाईचा हा गेल्या चार महिन्यांतील नीचांकी स्तर आहे. यापूर्वी 12 मार्च रोजी किरकोळ महागाई दराची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती त्यानुसार महागाईचा दर 5.09 टक्के इतका नोंद झाला होता. वाणिज्य मंत्रालयाने गुरुवारी घाऊक महागाई दराबाबत आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार  फेब्रुवारी महिन्यात खाद्यपदार्थांचा महागाई दर 6.95 टक्के होता. प्राथमिक वस्तूंच्या घाऊक महागाईचा दर 4.49 टक्के आहे, जो मागील महिन्यात 3.84 टक्के होता. खाद्यपदार्थ, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, वीज, यंत्रसामग्री आणि उपकरणे, मोटार वाहने, टेलर आणि सेमीटेलर यांच्या किमतीत वाढ नोंद झाली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या घाऊक महागाईचा दर 8.24 टक्के झाला आहे. तर इंधन आणि ऊर्जेचा महागाई दर जानेवारीत -1.59 टक्के होता. उत्पादित उत्पादनांचा महागाई दर -1.27 टक्के आहे. किरकोळ महागाई दराच्या आकडेवारीप्रमाणेच घाऊक महागाई दराच्या आकडेवारीतही खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अन्न निर्देशांक फेब्रुवारी 2024 मध्ये घाऊक महागाई दरात 4.09 टक्क्मयांवर पोहोचला आहे. जानेवारी 2024 मध्ये तो 3.79 टक्के होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.