महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

घाऊक महागाई दराचा 15 महिन्यांचा उच्चांक

06:45 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याचा परिणाम, मे महिन्यात 2.61 टक्क्यांची नोंद

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

मे महिन्यात घाऊक महागाई दर मागील 15 महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. शुक्रवार, 14 जून रोजी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार मे महिन्यात घाऊक महागाई दर 2.61 टक्के इतका नोंद झाला आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये घाऊक महागाई दर 3.85 टक्के या सर्वोच्च पातळीवर होता. तर एप्रिल 2024 मध्ये हा दर 1.26 टक्के होता. एप्रिलमध्ये घाऊक महागाईने 13 महिन्यांतील सर्वोच्च पातळी गाठली होती. त्यापूर्वी एक महिना आधी म्हणजेच मार्च 2024 मध्ये 0.53 टक्के तर फेब्रुवारीमध्ये 0.20 टक्के अशी महागाईची पातळी राहिली.

मे महिन्यात अन्नधान्य महागाईत 1.88 टक्क्यांनी वाढ नोंद झाली आहे. त्याचाच परिणाम घाऊक महागाई वाढण्यावर झाला आहे. एप्रिलच्या तुलनेत अन्नधान्य महागाई 5.52 टक्क्यांवरून 7.40 टक्केपर्यंत वाढली आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा महागाई दर 5.01 टक्क्यांवरून 7.20 टक्के झाला आहे. इंधन आणि उर्जेचा घाऊक महागाई दर 1.38 टक्क्यांवरून किंचित घसरून 1.35 टक्केपर्यंत कमी झाला. उत्पादित वस्तूंच्या घाऊक महागाईचा दर -0.42 टक्क्यांवरून वाढ होत 0.78 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

यापूर्वी चालू आठवड्याच्या प्रारंभी मे महिन्यातील किरकोळ महागाईचे आकडे जाहीर करण्यात आले होते. यानुसार मे महिन्यात किरकोळ महागाई 4.75 टक्के होती. किरकोळ महागाईचा हा 12 महिन्यांचा नीचांक आहे. तर महिनाभरापूर्वी म्हणजेच एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर 4.83 टक्क्मयांवर होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article