महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ठाकरे शिवसेना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवाराच्या शोधात

03:41 PM Nov 22, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

कोण देणार मंत्री केसरकरांना टक्कर ? कोणाच्या हातात पडणार उमेदवारीचे तिकीट ?

Advertisement

संतोष सावंत

Advertisement

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या विधानसभा मतदारसंघाची उमेदवार चाचणी गुप्तरित्या सुरू आहे. या मतदारसंघात चार वेळा शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या या मतदारसंघात सर्वप्रथम शिवसेनेचे आमदार म्हणून शिवराम दळवी हे निवडून आले होते . सलग दोन वेळा ते या मतदारसंघात निवडून आले होते. त्यानंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची रचना बदलली आणि त्यात वेंगुर्ला तालुका समाविष्ट झाला. त्यामुळे या मतदारसंघात हॅट्रिक साधण्यासाठी सज्ज झालेले आमदार शिवराम दळवी यांचा पराभव झाला. त्यानंतर तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर निवडून आले. श्री केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत या मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य लक्षात घेऊन शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. आणि केसरकर शिवसेने मधून आमदार म्हणून निवडून आले. सलग तीन टर्म ते आमदार राहिले आहेत. त्यातील दोन टर्मही शिवसेना पक्षाच्या चिन्हावर ते निवडून आले आहेत. शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून श्री केसरकर दोन्ही वेळा निवडून आले आहेत. या मतदारसंघात आता शिवसेनेचे प्राबल्य आहे. श्री केसरकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला रामराम करत सत्तेतील शिंदे गट शिवसेना पक्षाला साथ देत सत्तेचे भागीदारी झाले आणि येथेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार शोधावा लागत आहे. आता लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागणार आहेत. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकाही पाच-सहा महिन्यांवर येऊन ठेपल्यात . एकंदरीत, लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर जवळपास सर्वच पक्षांनी आपले विधानसभेचे उमेदवार अप्रत्यक्षरित्या निश्चित केले आहेत. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विधानसभेचा उमेदवार कोण असावा या दृष्टीने चाचणी करीत आहे . स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायची की पुन्हा एकदा मुंबईहून स्थानिक व्यक्तीला उमेदवारी द्यायची या विवंचनेत पक्षश्रेष्ठी आहेत. महाविकास आघाडी झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन जागांपैकी कणकवली आणि कुडाळ या दोन मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार जवळपास निश्चित आहेत. कुडाळ मतदार संघाचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांनाच पुन्हा कुडाळ उमेदवारी मिळणार आहे. तर कणकवली मतदारसंघात गतकाळी अवघ्या आठवड्याभरात शिवसेना पक्षाचा एबी फॉर्म घेऊन निवडणूक लढलेले जिल्हा बँकेचे माजी चेअरमन सतीश सावंत यांनी विद्यमान आमदार नितेश राणे यांच्याशी चांगली टक्कर दिली होती. त्यामुळे ,पुन्हा एकदा कणकवलीतून श्री सावंत यांचेच नाव पक्षश्रेष्ठींसमोर आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतून निवडणूक झाल्यास जवळपास हे दोन मतदारसंघ शिवसेनेकडेच राहतील. मात्र , सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मोठे प्राबल्य आहे जवळपास 45 ते 50 हजार मते ही शिवसेनेची हक्काची आहेत. हा विचार करता या मतदारसंघातही शिवसेनेचा उमेदवार दिला असता विद्यमान आमदार श्री दीपक केसरकर यांना टक्कर देऊ शकतो आणि ठाकरे शिवसेनेचा पुन्हा आमदार निवडून येऊ शकतो . त्यामुळे एकंदरीत शिवसेना पक्षश्रेष्ठींनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार कोण असावा या दृष्टीने चाचणी सुरू केली आहे. तशा मातोश्री स्तरावर बैठकाही होत आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. मी पुन्हा याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार असे आठवड्याभरापूर्वी जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने दीपक केसरकरांना टक्कर देणारा उमेदवार असावा या दृष्टीने आतापासूनच उमेदवार शोध सुरू केला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी कोणाला देणार या दृष्टीने उमेदवार शोध सुरू केला असतानाच काही जणांची नावे सध्या पुढे येत आहेत. त्यात स्थानिक पक्षातील पदाधिकारी आपल्याला उमेदवारी मिळावी या इच्छेवर आहेत. तसेच सिंधुदुर्ग सुपुत्र असलेले शैलेश परब यांचे नाव देखील चर्चेत आहे .खासदार विनायक राऊत यांचे भाचे असलेले शैलेश परब हे या मतदारसंघातून थोडेफार अलिप्त झाले होते. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी केसरकर यांच्या प्रचारात त्यांनी प्रमुख भूमिका घेत श्री केसरकर यांना निवडून आणण्याच्या दृष्टीने मूळ शिवसैनिकांना सोबत घेऊन चांगली बांधणी केली होती. आणि त्यामुळे शिवसेनेचे केसरकर सहज निवडून येऊ शकले. हे पक्षश्रेष्ठींना चांगलेच माहित आहे . त्यामुळे आता केसरकरांना टक्कर कोणता उमेदवार देऊ शकतो या दृष्टीने पक्षश्रेष्ठीने विचार सुरू केला आहे . उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष या मतदारसंघात कुणी अन्य पक्षातील मातब्बर व्यक्ती आपल्या पक्षात घेऊन त्यांना केसरकरांसमोर उभे करायचे का या दृष्टीनेही विचार करत आहे. तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांना भगवा शेंदूर लावायचा की शैलेश परब यांनाच उमेदवारी द्यायची या दृष्टीने चाचणी सुरू केली आहे. समजा महाविकास आघाडीतून विधानसभेचे निवडणूक लढवली गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अर्चना घारे परब यांनी उमेदवारीच्या दृष्टीने काम सुरूही केले आहे . तरी असे असले तरीठाकरे शिवसेना पक्ष लोकसभा निवडणुकीपूर्वी आता येत्या महिन्याभरातच विधानसभेचा संभाव्य उमेदवार कोण असणार या दृष्टीने निश्चित मोर्चे बांधणी करणार आहे. आणि त्या दृष्टीने आतापासूनच ठाकरे शिवसेनेने गावागावात पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडे संभाव्य उमेदवार कोण असावा या दृष्टीने चर्चा सुरू केली आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat news# sawantwadi # uddhav thakreay #
Next Article