Ajit Pawar | विमानात कोण कोण होते? अजित पवार अपघात प्रकरणी मोठी माहिती समोर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमानाच्या अपघातामुळं दुखःद निधन
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमानाच्या अपघातामुळं दुखःद निधन झाले आहे. महाराष्ट्र राजकारणातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून बारामतीला येत असताना लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे विमान विमानतळाजवळील शेतात कोसळले. या भीषण अपघातात विमानाने पेट घेतला आणि त्यात अजितदादांसह ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
मुंबईमधून बारामतीमध्ये उतरताना अजित पवार यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. बारामतीमध्ये अजित पवार यांची सभा होणार होती. या सभेसाठी जात असतानाच ही मोठी दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे.
विमानाच्या लँडिंग वेळी हा अपघात झालेला आहे. या अपघाताचे धक्कादायक व्हिडिओही आता समोर येत आहेत. विमान उतरत असताना एका शेतात ते कोसळल्याचे दिसत आहे.विमान कोसळल्यानंतर विमान जळाल्याचे दिसत आहे. यामुळे परिसरात काही काळ धुराचे लोट दिसत होते. सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले होते. मात्र अपघात इतका भीषण होता की, त्यात सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार यांच्यासोबत विमानात कोण कोण होते? यांची माहिती समोर येत आहे.
अजित पवार यांच्यासोबत विमानात कोण कोण होते?
कॅप्टन सुमित कपूर
कॅप्टन शांभवी पाठक
मुंबई पीएसओ HC (अंगरक्षक) विदिप जाधव
फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी