Sangli crime | पती घरी नसताना घरात कोणाचा वावर होता? सांगलीतील विवाहितेच्या आत्महत्येनंतर समोर आला अंगावर काटा आणणारा थरार!
रिल्सवरून वाद, विवाहितेची नदीत उडी; रिक्षाचालकावर गुन्हा
सांगली : सोशल मीडियावर रिल्सबनविण्यास विरोध करत घराबाहेर पडण्यावरही निर्बंध घालून मानसिक व शारीरिक छळ केल्याने विवाहितेने थेट अंकली पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी एका रिक्षाचालकाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
प्राजक्ता योगेश देसाई (वय २७, रा. केशवनाथ मंदिरानजीक, पाटील गल्ली, गावभाग, सांगली) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ही घटना १३ मे रोजी दुपारी घडली. याप्रकरणी पती योगेश नामदेव देसाई (रा. देवराष्ट्रे) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रिक्षाचालक संदिप बाळासाहेब माने (रा. हरिपूर,ता. मिरज) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्याच्या निमित्ताने प्राजक्ता आणि संशयित संदिप माने यांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये संपर्क बाढला. फिर्यादी योगेश देसाई घरी नसताना संदिप माने याचे प्राजक्ता यांच्या घरी येणे-जाणे सुरू होते.दरम्यान, प्राजक्ता या मोबाईलवर रिल्स तयार करत होत्या. याच कारणावरून संदिप आणि प्राजक्ता यांच्यात वारंवार बाद होत होता. "रिल्स करायच्या नाहीत", "घराच्या बाहेर जायचे नाही", अशा प्रकारची बंधने घालत संदिप माने याने प्राजक्ता यांना मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप * फिर्यादीत करण्यात आला आहे.
सततच्या त्रासाला आणि दबावाला कंटाळून प्राजक्ता यांनी अखेर अंकली पुलावरून नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या घटनेनंतर परिसरात हळहळ ब्यक्त होत असून सोशल मीडियाच्या बादातून एका विवाहितेचा जीव गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.सांगली ग्रामीण पोलिसांनी संशयित संदिप माने याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.