For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

साखर कमी करण्यासाठी Artificial Sweeteners घेताय? WHO ने दिला इशारा

06:09 PM May 22, 2023 IST | Abhijeet Khandekar
साखर कमी करण्यासाठी artificial sweeteners घेताय  who ने दिला इशारा

Artificial Sweeteners : साखर खाण्यासाठी योग्य नसते असे अनेकदा डॉक्टर आपल्याला सांगतात. याशिवाय जिममध्ये वर्कआऊट करताना साखर खाणे पूर्ण बंद करा असा सल्ला दिला जातो. एवढचं नाही तर रक्तातील साखर वाढली की आहारातून साखर गायब करावी लागते. यासाठी मग शूगर फ्री गोळ्या किंवा शुगर फ्री डायट ड्रींकचा वापर अधिक केला जातो. मात्र आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात WHO ने या कृत्रिम साखरने नुकसान होऊ शकते अस म्हटलयं.

Advertisement

WHO ने 15 मे 2023 ला एक अहवाल सादर केला .ज्य़ामध्ये नॉन-शुगर स्वीटनर्सचा एकूण 283 अहवालाचा एकत्रित अभ्यास केलायं. यामध्ये कृत्रिम स्वीटनर्स किंवा नॉन-शुगर स्वीटनर्सच्या वापराने टाईप 2 चा मधुमेह होतो,असा निष्कर्ष काढलायं. याचबरोबर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि प्रौढांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढल्याचेही स्पष्ट केलयं.

मधुमेह टाईप 1 आणि टाईप 2 काय असतो याविषयी थोडक्यात जाणून घेऊया.

Advertisement

मधुमेह टाईप- 1
जेव्हा शरीरात इन्सुलिनचे उत्पादन कमी होते, तेव्हा शरीराला रक्तातील ग्लुकोजमधून ऊर्जा मिळू शकत नाही. परिणामी, रक्त आणि लघवीतील ग्लुकोजची पातळी खूप जास्त होते.
यावेळी टाईप- 1 चा मधुमेह होतो. यामध्ये प्रामुख्याने वय वर्ष 4 ते वय वर्षे 15 या वयोगटातील मुलांचा समावेश असतो. काहीवेळेला प्रौढांमध्ये हा मधुमेह दिसू शकतो. टाइप 1 मधुमेहामध्ये स्वादुपिंडामध्ये इन्शुलिन तयार होत नाही किंवा याचे प्रमाण अगदी नगण्य असते. त्यामुळे टाइप 1 मधुमेहाच्या रुग्णाला इन्शुलिन गरजेचं असतं.

Advertisement

मधुमेह टाईप -2
स्वादुपिंडामध्ये इन्शुलिन हे संप्रेरक तयार होते,जे साखरेवर नियंत्रण ठेवते.टाईप 2 मधुमेहामध्ये इन्शुलिन पुरेशा प्रमाणात तयार होत नाही व त्याची परिणामकारकता देखील कमी असते.याला इन्शुलिन प्रतिरोध असेही म्हणतात.टाईप 2 मधुमेह असलेल्या बऱ्याचशा लोकांमध्ये लठ्ठपणा आढळतो. वयाच्या चाळीशीनंतर प्रामुख्याने टाईप -2 चा मधुमेह होतो. मात्र आता कृत्रिम स्वीटनर्समुळे हा मधुमेह कमी वयात देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीयं.

डब्ल्यूएचओचे पोषण आणि अन्न सुरक्षा संचालक फ्रान्सिस्को ब्रँका यांनी डब्ल्यूएचओने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, कृत्रिम स्वीटनर्समुळे वजन नियंत्रणात राहत नाही. त्यामुळे याचे सेवन टाळावे. याउलट ज्या फळात साखरेचे प्रमाण जादा आहे अशी फळे खावीत.आरोग्य चांगलं राहण्यासाठी सर्वांनीच सुरुवातीपासूनच आहारातील गोडवा पूर्णपणे कमी केला पाहिजे, असंही ते म्हणाले.

तुम्हालाही जर मधुमेह असेल किंवा वजन नियंत्रणात आणण्यासाठी साखर आहारातून गायब करायची असेल. तर नियमित व्यायाम, प्राणायाम करा. आहारात बदल करा. साखरेऐवजी गुळाचा, मधाचा वापर करा. तुमची दैनंदिनी ठरवताना तुम्ही काय खाता याकडे लक्ष द्या. कोणतेही औषध किंवा डायट सुरु करत असताना एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Advertisement
Tags :
×

.