For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उस्ते येथील ‘व्हाईट वॉटर राफ्टिंग’ संकटात

07:39 AM Jul 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
उस्ते येथील ‘व्हाईट वॉटर राफ्टिंग’ संकटात
Advertisement

पाण्याचा प्रवाह घटल्याने उपक्रम बंद पडण्याची शक्यता : अर्थव्यवस्थेला बसणार मोठा फटका

Advertisement

त.भा.  प्रतिनिधी

वाळपई : गोवा पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून सत्तरी तालुक्यातील नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील उस्ते येथे गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वीपणे सुरू असलेला ‘व्हाईट वॉटर राफ्टिंग’ हा साहसी पर्यटन उपक्रम यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे अडचणीत सापडला आहे.

Advertisement

पावसाने आणखी काही दिवस अशीच दडी मारल्यास हा उपक्रम तात्पुरता बंद करण्याची वेळ येऊ शकते. गेल्या चार दिवसांपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याने म्हादई नदीच्या पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात कमी झाला असून त्याचा थेट परिणाम राफ्टिंगवर झाला आहे. त्यामुळे या पर्यटन उपक्रमासाठी येणाऱ्या शेकडो पर्यटकांबरोबरच स्थानिक व्यावसायिक, ग्रामपंचायत आणि पर्यटनाशी संबंधित अनेक घटकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात

आहे.

यंदा पावसाळ्याच्या सुऊवातीला झालेल्या दमदार पावसानंतर गेल्या आठवड्यात या हंगामातील राफ्टिंगला प्रारंभ करण्यात आला होता. सुऊवातीच्या काही दिवसांत एकूण पाच खेपा यशस्वीरीत्या पार पडल्या. मात्र त्यानंतर पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने नदीतील पाण्याची पातळी आणि प्रवाह दोन्ही झपाट्याने कमी झाले. विशेष म्हणजे घाटमाथा परिसरातही गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस नसल्याने म्हादई नदीला येणाऱ्या पाण्याचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे या उपक्रमावर संकट ओढवले आहे.

प्राप्त माहितीनुसार, सद्यस्थितीत पाण्याचा प्रवाह अपेक्षित पातळीपर्यंत नसल्यामुळे व्यवस्थापनाकडून ऑनलाइन बुकिंग तात्पुरते बंद करण्याचाही विचार सुरू आहे. देशभरातून पर्यटक ऑनलाइन पद्धतीने आगाऊ नोंदणी करत असल्याने, पावसाअभावी उपक्रम रद्द करावा लागल्यास पर्यटकांची गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय विचाराधीन असल्याचे समजते.

या पर्यटन उपक्रमाचा फायदा केवळ पर्यटकांपुरता मर्यादित नसून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात होतो. नगरगाव ग्रामपंचायतीला या उपक्रमातून महसूल प्राप्त होतो. तसेच वाळपई शहरातील हॉटेल व्यवसाय, भोजनालये, किरकोळ दुकाने, वाहनचालक, मार्गदर्शक, स्थानिक विक्रेते तसेच पर्यटनाशी संबंधित अनेकांना रोजगार व व्यवसायाची संधी उपलब्ध होते. त्यामुळे राफ्टिंग बंद पडल्यास त्याचा परिणाम अनेक पूरक व्यवसायांवरही होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.