For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओडिशातील उद्यानात पांढऱ्या वाघिणीचा मृत्यू

06:37 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
ओडिशातील उद्यानात पांढऱ्या वाघिणीचा मृत्यू
Advertisement

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

Advertisement

ओडिशातील भुवनेश्वर येथील नंदनकानन प्राणी उद्यानात असलेल्या ‘स्नेहा’ या 14 वषीय पांढऱ्या वाघिणीचा शुक्रवार, 19 एप्रिल रोजी मृत्यू झाला. गुऊवारी ही वाघीण आजारी असल्याचे समजल्यापासून तिच्यावर उपचार सुरू होते. विशेष वैद्यकीय पथकाकडून सदर वाघिणील सलाईन आणि औषधे देण्यात आली होती. मात्र शुक्रवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.

स्नेहा नामक वाघीण म्हातारी झाली होती. ती अनेकदा आजारी असायची. 1 मार्च 2010 रोजी स्नेहाचा जन्म रॉयल बंगाल टायगर निशान आणि पांढरी वाघीण कुसुम यांच्या पोटी झाला. स्नेहाने 5 ऑगस्ट 2016 रोजी मौशुमी (मादी), चिनू (नर) आणि दुर्मिळ मेलेनिस्टिक विकी (नर) या तीन पिल्लांना जन्म दिला. त्यानंतर पुन्हा एकदा लव आणि कुश तसेच 28 मार्च 2021 रोजी राकेश, रॉकी आणि बन्सी या तीन नर शावकांना जन्म दिला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.