सामाजिक बांधिलकीकडून सावंतवाडीतील गतिरोधकांवर पांढऱ्या पट्ट्या
अपघात टाळण्यासाठी संस्थेचे पाऊल
सावंतवाडी-
येथील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने शहरात वाढत चाललेल्या अपघातांचा धोका लक्षात घेऊन ठीक ठिकाणच्या धोकादायक असणाऱ्या गतिरोधकांवर पांढऱ्या पट्ट्या मारण्याचा उपक्रम राबविला जात असून त्याचे सावंतवाडीकरांकडून देखील कौतुक होत आहे . या उपक्रमासाठी पुढाकार घेणारे सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव,पेंटर लक्ष्मण कदम, पेंटर मंगेश सावंत , सचिव समीरा खलील, सुजय सावंत, युवराज राऊळ, गौरव रजपूत, देव्या सूर्याजी,सचिन मोरजकर ,प्रशांत मोरजकर, संदीप निवळे यांनी सहभाग घेतला. या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते देव्या सूर्याची,अजय गोंदावळे , नीरज देसाई, विनायक गावस, संदीप निवळे, सुशील चौगुले, संजय वरेरकर, गजानन बांदेकर, प्रशांत मोरजकर यांनी सामाजिक बांधिलकीच्या सदस्यांचे कौतुक केले.आज रात्री पुन्हा शहरातील उरलेल्या गतिरोधकांना पट्ट्या मारण्याचा उपक्रम हाती घेणार असल्याचे संस्थेच्या रवी जाधव यांनी सांगितले