For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

...तर स्टार प्रचारकांचा खर्च उमेदवारांच्या नावावर

11:57 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
   तर स्टार प्रचारकांचा खर्च उमेदवारांच्या नावावर
Advertisement

निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांचे राजकीय प्रतिनिधींना मार्गदर्शन

Advertisement

बेळगाव : उमेदवारांनी पक्षाच्या स्टार प्रचारकाबरोबर प्रचार कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्यास त्या कार्यक्रमाचा खर्च उमेदवाराचा खर्च म्हणून ग्राह्या धरला जाईल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. बेळगाव लोकसभा मतदारसंघ सामान्य पर्यवेक्षक, खर्च पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, मंदिर, मशीद, चर्च यासह कोणत्याही धार्मिक ठिकाणी निवडणुकीचा प्रचार करू नये, असे प्रकार आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. कोणत्याही शिक्षण संस्थेत प्रचार करण्यात येऊ नये. यासाठी संस्थेकडून पूर्व अनुमती घेण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाकडून नेमणूक केलेल्या सामान्य पर्यवेक्षक, पोलीस पर्यवेक्षक व खर्च पर्यवेक्षक कोणत्याही वेळी उपलब्ध आहेत. त्यामुळे निवडणुकीसंदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असे नितेश पाटील यांनी सांगितले.

उमेदवारांना 95 लाखापर्यंत खर्च मर्यादा

Advertisement

खर्च नोडल अधिकारी शंकरानंद बनशंकरी यांनी निवडणुकीतील उमेदवारांकडून कायद्यानुसार किती खर्च करावा या संदर्भात मार्गदर्शन केले. राज्यात प्रत्येक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराला 95 लाखांपर्यंत खर्चाची मर्यादा दिली आहे. निवडणुकीचा प्रचार, वाहन खर्च, जाहिरात प्रचार इत्यादी कायद्यानुसार खर्च करण्याची मुभा आहे. मात्र मतदारांना जेवणावळी अथवा आमिष दाखवू नये. उमेदवारांनी आपल्या जॉईंट खात्याद्वारेच निवडणुकीच्या प्रचाराचा खर्च करावा. 10 हजारापेक्षा अधिक खर्च असल्यास चेकद्वारे करावा. युपीआयद्वारेही खर्च करायची सोय असल्याचे बनशंकरी यांनी सांगितले. स्टार प्रचारकांबरोबर उमेदवारांनी व्यासपीठावर हजर असल्यास संपूर्ण खर्च उमेदवाराच्या नावे नमूद केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.