कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘फुटबॉल’चा जन्म नेमका कोठला...

06:37 AM May 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘फुटबॉल’ हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. ही केवळ समजूत नसून खरोखरच तशी स्थिती आहे. प्रत्येक देशात हा खेळ खेळला जातो. या खेळाची प्रत्येक चार वर्षांनंतर भरणारी जागतिक स्पर्धा टीव्हीवर पाहणाऱ्यांची संख्या इतर कोणत्याही खेळाच्या अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धेपेक्षा अधिक आहे. अब्जावधी क्रीडाप्रेमी ही स्पर्धा पाहतात. तर अशा या खेळाचा जन्म नेमका कुठे झाला, यावर आता नव्याने चर्चा करण्याची स्थिती निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

Advertisement

आजवरच्या समजुतीप्रमाणे फुटबॉल हा खेळ इंग्लंडमध्ये जन्माला आला आहे. ही समजूत थोडीथोडकी नव्हे, तर गेल्या 200 वर्षांपासून आहे. तथापि, आता या समजुतीला तडा जाईल, अशी स्थिती आहे. कारण नव्या संशोधनानुसार हा खेळ इंग्लंडमध्ये नव्हे, तर स्कॉटलंडमध्ये प्रथम जन्मला आहे. अर्थातच, या नव्या संशोधनावर अनेकांचा आक्षेप आहे. त्यामुळे नव्या वादाचा जन्म झाला आहे.

वास्तविक स्कॉटलंड आणि इंग्लंड हे एकाच ब्रिटन देशाचे भाग होते, किंवा आजही आहेत. पण आज ते तांत्रिकदृष्ट्या स्वतंत्र देश म्हणून ओळखले जातात. त्यामुळे फुटबॉलचा जन्म ब्रिटनमध्ये झाला, यावर कोणाचेही दुमत नाही. तथापि, आता इग्लंड की स्कॉटलंड हा वाद निर्माण झाला आहे. या खेळाचे सर्वात पुरातन मैदान स्कॉटलंड भागात सापडले आहे. या मैदानाचा उल्लेख रेव्हरंड सॅम्युएल रुदरफोर्ड यांनी एन्वॉथ ओल्ड यांना लिहिलेल्या पत्रात आहे. स्थानिक मुले रुदरफोर्ड यांच्या घरापाशी असलेल्या सपाट शेतात फुटबॉल खेळतात, यासंबंधी त्यांनी या पत्रात आक्षेप घेतला असल्याचे स्पष्ट होत आहे. हे पत्र इसवीसन 1627 मधील आहे. त्यावेळी ओल्ड हे स्थानिक मंत्री होते. त्यामुळे त्यांना हे पत्र पाठविण्यात आले होते. या पत्रावरुन असे स्पष्ट होते की, हा खेळ 1627 च्या पूर्वीपासूनच खेळला जात होता आणि तो स्कॉटलंडमध्ये खेळला जात होता. मात्र, इंग्लंडचे तज्ञ हा पुरावा पुरेसा मानत नाहीत. त्यामुळे वाद होत आहे. तथापि, आता फुटबॉलचे जन्मस्थान म्हणून इंग्लंडप्रमाणे स्कॉटलंडचाही उल्लेख करावा लागणार, असे मत अनेक इतिहास तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article