For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अखेर पन्हाळकरांचा पाणी प्रश्न कधी सुटणार..!

05:58 PM Mar 15, 2025 IST | Pooja Marathe
अखेर पन्हाळकरांचा पाणी प्रश्न कधी सुटणार
Advertisement

नवीन योजना होऊन देखील पाणीटंचाईची समस्या कायम..!

Advertisement

वारंवार होत आहेत योजनेमध्ये बिघाड..!

कोल्हापूरः अबिद मोकाशी

Advertisement

पन्हाळा शहराला पाणी टंचाईची समस्या सुटता सुटेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जुनी योजना जीर्ण झाल्यामुळे त्यामध्ये वारंवार बिघाड होत होते पण आता उत्रे येथील जवळपास साडेसात कोटी रुपये खर्च करून नवीन योजना सुरू होऊन देखील पन्हाळा शहराचा पाणी टंचाईचा प्रश्न आज देखील सुटलेल नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. नवीन योजना सुरू झाली की पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा मिटून जाईल अशी आश्वासने देण्यात आली होती. मात्र ही आश्वासने आता फोल ठरले आहेत. या नवीन योजनेमध्ये होण्राया सततच्या बिघाडामुळे पन्हाळा शहराला एक दिवस अडाने व अपुरा पाणीपुरवठ्याची समस्या दिवसेंदिवस गडद होत चालली आहे. त्यामुळे पन्हाळकरांचा पाणी प्रश्न अखेर सुटणार तरी कधी व कशाप्रकारे याची विचारणा स्थानिक नागरिकांच्यातून होत आहे.

पाईपलाईन लिकेज होणे, पाणी उपसा करण्राया विद्युत मोटारी बिघाड होणे, विद्युत पुरवठा खंडित होणे, कासारी नदी पाणी नसणे, जॅकवेल पासून नदीचे अंतर दूर असणे ही उत्तरे आता पन्हाळकरांना तोंडपाठ झाली आहेत. मागील दोन ते तीन आठवड्यापासून पन्हाळा शहराला अपुरा व अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे नागरिकांना आपल्या हातातील कामे सोडून स्वत?च पाण्याची सोय करणे भाग पडले आहे. पाणी सोडण्याची वेळ देखील ठरलेले नसल्याने पाणी कधी येईल याकडे घरातील मंडळी नळाच्या कॉक कडे डोळे लावून बसलेले असतात. नगरपालिकेकडून व्हाट्सअप ग्रुप वर पाणी अमुक वाजता, अमुक दिवशी अमुक भागातील असे मेसेज फिरवले जातात. नागरिक ही मेसेज वाचून पाणी येईल या अपेक्षेमुळे काही बोलत नाहीत. तर नगरपालिकेकडून देखील पर्यायी व्यवस्था होत नसल्याने नागरिक आहे त्या परिस्थितीत वेळ मारून नेत आहेत. सध्या उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे त्यातच हो, रंगपंचमी, गुढीपाडवा हे तोंडावर येऊन ठेपले आहेत. तर मुस्लिम धर्मातील पवित्र रमजान महिना सुरू असल्याने पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

नवीन योजना सुरू झाली की पन्हाळ्याचा पाण्याचा कायमचा प्रश्न सुटेल असे वाटत होते. पण जुनी योजना आणि नवीन योजना या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्याचे समोर आले आहे. एक दिवस आड व अपुरा पाणीपुरवठा पन्हाळकरांसाठी हे जणू काय पाचवीलाच पुजले असल्याचे चित्र आहे. एक दिवस आड म्हणजेच महिन्यातील पंधरा दिवस पाणी येते, त्यात योजनेमध्ये काही बिघाड झाल्यास दोन-तीन दिवस पाण्याला सुट्टी. म्हणजे पन्हाळकरांना जेमतेम दहा दिवसच पाणीपुरवठा होते. पण बिल मात्र ७०० व हजार च्या घरातच.पण आता किती दिवस गप्प बसायचे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती होत असेल तर ऐन उन्हाळ्यात काय परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. पन्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न तातडीने मिटवला नाही तर मात्र नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे नगरपरिषदेला आधीच तोट्यात असलेली ही योजना कशी चालवावी याचे फार मोठी दिव्य आता पार पाडावे लागणार आहे.

पन्हाळा शहराला पाणी समस्येचे मोठे ग्रहण लागले आहे. नवीन योजना सुरू होऊन देखील पाणी समिती समस्या जैसे ते परिस्थितीत आहे. नगरपरिषद प्रशासनाकडे विचारणा केल्यास योजनेमध्ये बिघाड होत असल्याची उत्तरे मिळतात. वारंवार होत असलेले बिघाडामुळे नवीन योजनेवर झालेला खर्च पाण्यात गेला आहे. तरी पन्हाळा शहराचा पाणीपुरवठा कायमचा सुरळीत व्हावा अन्यथा तीव्र आंदोलन ग्रामस्थांच्या सहकार करण्यात येईल.
(राजीव सोरटे संस्थापक अध्यक्ष-राष्ट्रीय बहुजन महासंघ)

ऊत्रे येथील नवीन नळ पाणीपुरवठा योजने द्वारे पन्हाळा शहराला पाणीपुरवठा करण्यात येते. पण उत्रे पासून पन्हाळा पर्यंत मोठा चढ लागतो. त्यात काही पाईप्स या जुन्या आहेत, त्यामुळे त्या नवीन पाईप्स मधून येण्राया पाण्याचे प्रेशर सहन करू शकत नाही, त्यामुळे जुन्या पाईपलाईन लिकेज होत आहेत. तरी लिकेज काढण्याचे काम सुरू असून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल. अशी माहिती नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.