अमली पदार्थांच्या विळख्यातून गोव्याला कधी मुक्ती ?
इंदूरच्या 21 वषीय तऊणाचा एका पार्टीत सहभागी झाल्यानंतर मृत्यू झाला. सुरवातीला या युवकाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, रक्ताच्या नमून्याची चाचणी घेतल्यानंतर युवकाचा अमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
वा राज्य बऱ्याच काळापासून अमली पदार्थांच्या विळख्यात आहे, गोवा हे मुक्तपणे चालणाऱ्या पार्ट्याचे ठिकाण बनले आहे. यावर सरकार अद्याप अंकूश ठेऊ शकलेले नाही. या आधी बिट्स पिलानीच्या एका विद्यार्थ्याचा अमली पदार्थाच्या सेवनामुळे मृत्यू झाला होता. गोव्यात ड्रग्स सर्रासपणे आढळून येतात. पोलिस कारवाई करतात, परंतु, हा तपास अधिक खोलात जाऊन का केला जात नाही. हे सुद्धा एक गूढ बनून राहिले आहे.
काही दिवसांपूर्वी, गोवा विधानसभेत ग्रामीण भागात खोलवर शिरत असलेल्या अमली पदार्थांविषयी आणि या धोक्मयाला बळी पडणाऱ्या तऊणांविषयी आमदारांनी धोक्मयाचा इशारा दिला होता. सरकारने अमली पदार्थांच्या विरोधात कडक पाऊले उचलण्याची मागणी केली होती. मात्र, हा विषय सरकारने गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत नाही.
गोव्यात होत असलेल्या पार्ट्यामध्ये कोकेन, एमडीएमए (एक्स्टसी), अॅम्फेटामाइन, हेरॉइन, इत्यादीचा वापर होत असतो. हे अमली पदार्थ गोव्यात येतात कुठून, त्याचा खरा सूत्रधार कोण याच्या मुळाशी न जाता केवळ जप्ती करून पोलिस अधिकारी समाधान मानतात. अलीकडेच, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 2030 पर्यंत गोव्याला अमली पदार्थमुक्त राज्य बनवण्याच्या उद्देशाने अमली पदार्थांविरोधात शून्य-सहिष्णुता धोरणाची घोषणा केली आहे. ही घोषणा अशा वेळी आली आहे, जेव्हा 2021 ते 2025 या काळात अमली पदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे आकडेवारी दर्शवते. आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की, अनेक दशकांपासून चालत आलेल्या प्रथेप्रमाणेच, अमली पदार्थांचे विव्रेते आणि दलालांवर कारवाई करण्यावरच भर दिला जात आहे. अलीकडील घटनांवरून असे दिसून येते की, आपण समस्येवर मात करत नाही आहोत. आपण तिचा पाठलाग करत आहोत.
किनारपट्टीवरील पार्टी स्थळांवर रात्री बाहेर फिरल्यानंतर तऊणांचा अचानक मृत्यू होतो, तेव्हा त्या दुर्दैवी घटनेइतकीच अनिश्चितताही निर्माण होते आणि ही अनिश्चितता एक समस्या आहे, कारण व्यवस्था सत्य नाकारत आहे. हे केवळ एका प्रकरणापुरते मर्यादित नाही, तर ही एक अशी पद्धत आहे जी शांतपणे आणि सातत्याने आकार घेत आहे. तऊण पर्यटक आणि विद्यार्थी गोव्याच्या पार्टीमय जीवनाकडे आकर्षित होऊन येथे येतात. प्रत्येक वेळी जेव्हा एखादी दुर्घटना घडते, तेव्हा एक भयाण शांतता पसरते आणि अमली पदार्थांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, दुर्देवाने कठोर कारवाई होताना दिसून येत नाही.
जर गोव्याने आपली नैतिक दिशा गमावली, तर पर्यटनाला काहीच अर्थ उरणार नाही आणि जर अशा संस्कृतीचा आपल्या तऊणांवर विपरीत परिणाम झाला, तर त्याला काहीच अर्थ उरणार नाही. अलीकडेच कुडचडे परिसरात लैंगिक गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस आले, त्याच वेळी परिसरात अमली पदार्थांच्या वाढत्या प्रसारावरही चर्चा झाली. गोव्यात अधुनमधून होत असलेल्या टोळीयुद्धांचा संबंध अमली पदार्थांशी आहे आणि अमली पदार्थ हा सर्वाधिक चर्चेचा सामाजिक विषय ठरला आहे.
आता असा एक प्रŽ विचारला जाऊ शकतो की, महाविद्यालयांमध्ये अमली पदार्थ प्रतिबंधात्मक चर्चा कुठे आहे? पालकांशी सातत्यपूर्ण संवाद कुठे आहे? उच्च जोखमीच्या ठिकाणी दृश्यमान, सातत्यपूर्ण तपासणी कुठे आहे? आणि प्रत्येक दुर्दैवी घटना व्यवस्थेला गाफील का ठेवते? राज्य सरकार आणि प्रशासनाने हे समजून घेतले पाहिजे की, याकडे दुर्लक्ष करून आपण अनेक पिढ्यांना धोक्मयात घालत आहोत. हे केवळ व्यवस्थेचे अपयश नाही, तर नैतिक अपयशही आहे.
महेश कोनेकर