For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाघवडे-मच्छे रस्त्याच्या डांबरीकरणाला मुहूर्त कधी?

10:06 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
वाघवडे मच्छे रस्त्याच्या डांबरीकरणाला मुहूर्त कधी
Advertisement

खड्डे, धूळ, मातीचे साम्राज्य : प्रशासनाचे रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Advertisement

वार्ताहर /किणये

मच्छे भागात औद्योगिक वसाहत आहे. याचबरोबर मच्छे ते वाघवडे या रस्त्याच्या आजूबाजूलाही अनेक कारखाने उभारलेले आहेत. त्यामुळे साहजिकच या परिसरात वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. हा भागही विकसित झाला असेच वाटते. मात्र वाघवडे ते मच्छे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्यांमुळे वाहनधारकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. खड्यांमुळे अनेक अपघातांच्या घटनाही घडलेल्या आहेत. या रस्त्याच्या दुऊस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी या भागातील नागरिकांतून होत आहेत. वाघवडे-मच्छे रस्त्यावर खड्डे व धूळीचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांतून या रस्त्याच्या दुऊस्तीची मागणीही होत आहे. मात्र या रस्त्याच्या डांबरीकरणाला मुहूर्त कधी मिळणार? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित करण्यात येऊ लागला आहे. वाघवडे, मच्छे, संतिबस्तवाड, मार्कंडेयनगर, रंगदोळी, काळेनट्टी, तीर्थकुंडये भागातील वाहनधारकांची रस्त्यावर रोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र सध्या असलेल्या रस्त्यांवरील खड्यांमुळे वाहनधारक अक्षरश: वैतागून गेले आहेत. मच्छे हावळनगर येथील रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. काही ठिकाणी मोठ्या खड्यांमुळे वाहनधारकांना ये-जा करताना बराच अडथळा निर्माण होऊ लागला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध प्रकारचे कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात येतो. रात्रीच्या वेळी खड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे काही दुचाकीस्वारांचे अपघात झालेले आहेत. औद्योगिक वसाहत असूनही इथल्या रस्त्यांची दुऊस्ती का करण्यात येत नाही, असा सवाल कामगार वर्गातून होत आहे.

Advertisement

ऊस वाहतूक करताना मोठी अडचण

वाघवडे ते मच्छे या चार किलोमीटरच्या रस्त्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. काही ठिकाणी रस्ता उखडून गेलेला आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनलेला आहे. ऊस तोडणीच्या वेळेला ट्रक वाहतूक करताना बराच अडथळा निर्माण झाला होता. वाघवडे गावातील कमानीपर्यंत रस्ता डांबरीकरण केलेला आहे. मात्र पुलावर पाऊस पडला की पाणी साचते. पुलावरील रस्ता करणे गरजेचे आहे. मच्छेजवळील रस्त्याचीही दुऊस्ती आवश्यक आहे. वाघवडेच्या कमानीपासून मुख्य रस्ता अतिशय खराब झाला आहे. रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करावे.

- संजय लोहार- वाघवडे

Advertisement
Tags :

.