For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘क्रेड’चे कुणाल यांच्या हाती व्हॉट्सअॅपची जागतिक धुरा

09:57 PM Jun 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘क्रेड’चे कुणाल यांच्या हाती व्हॉट्सअॅपची जागतिक धुरा
Advertisement

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांची माहिती : नव्या बदलानुसार महसूल वाढीवर भर देणार

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

कुणाल शाह यांची व्हॉट्सअॅपच्या नव्या जागतिक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही माहिती मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी दिली.फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटाने क्रेड अॅपचे संस्थापक कुणाल शाह यांची व्हॉट्सअॅपच्या नव्या जागतिक प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.

Advertisement

कुणाल हे विल कॅथकार्ट यांची जागा घेणार आहेत. जे 7 वर्षे व्हॉट्सअॅपच्या प्रमुखपदी होते. कॅथकार्ट आता मेटा येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) संबंधित नवीन प्रकल्पांवर काम करतील. ही माहिती मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी दिली. त्यांनी सांगितले की, कंपनीने हा निर्णय त्या करारानुसार घेतला आहे, ज्यामध्ये मेटा युपीआय आणि बिल पेमेंट अॅप क्रेडमध्ये सुमारे 8,550 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. त्या बदल्यात, मेटाला क्रेडमध्ये 20 टक्के इतका हिस्सा मिळेल. यानंतर, क्रेडिट कंपनीचे एकूण मूल्यांकन 43,239 कोटी रुपयांपर्यंत वाढेल.

महसूल वाढवण्यावर लक्ष केंद्रित

मेटाच्या म्हणण्यानुसार, कुणाल शाह बॉस झाल्यानंतर व्हॉट्सअॅप दोन मोठ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करेल. यामध्ये पहिले महसूल वाढवणे: कंपनी आता व्हॉट्सअॅपद्वारे अधिक पैसे कमावण्यासाठी सज्ज होत आहे. यासाठी अॅपमध्ये जाहिराती दाखवल्या जाऊ शकतात आणि काही विशेष फीचर्ससाठी मासिक शुल्क म्हणजेच सबक्रिप्शन देखील आकारले जाऊ शकते. दुसरे एआयचा वापर: व्हॉट्सअॅपमध्ये विविध प्रकारचे ‘एआय एजंट’ (म्हणजेच कॉम्प्युटर प्रोग्राम किंवा चॅटबॉट्स) जोडले जातील. ही एआय साधने तुमची अनेक कामे सोपी करण्यास आणि चॅट अधिक चांगले करण्यास मदत करतील.

व्हॉट्सअॅप-फेसबुक-इन्स्टाग्राम प्लस व्हर्जन येणार

मेटाने अलीकडेच इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसाठी नवीन सबक्रिप्शन प्लॅन सादर केले आहेत. याअंतर्गत अॅपचे ‘प्लस’ व्हर्जन आणण्यात आले आहे. जे वापरकर्ते हा प्लॅन घेतील त्यांना विशेष टूल्स आणि कस्टमायझेशनचे पर्याय मिळतील.

Advertisement
Tags :

.