व्हॉट्सअॅप, युपीआय, प्राईम व्हीडीओ : नियम बदलणार
1 जानेवारीपासून नवे नियम लागू : युपीआय व्यवहारांची मर्यादा दुप्पट होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवीन बदलत्या वर्षात अनेक गोष्टी बदलताना दिसणार आहेत. यामध्ये आता व्हॉट्सअॅप, युपीआय आणि प्राइम व्हिडिओच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे
व्हॉट्सअॅपमध्ये काय बदल होणार?
नवीन वर्ष 2025 पासून ठराविक अँड्रॉइड फोनवर व्हॉट्सअॅप काम करणे बंद करणार असल्याची माहिती या अगोदरच व्हॉट्सअॅपने दिली होती. आता हा नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू केला जाणार आहे.
1 जानेवारीपासून सॅमसंगचा गॅलेक्सी एस3, गॅलेक्सी नोट 2, गॅलेक्सी एसीइ3, गॅलेक्सी एस4 मिनी, एचटीसी वन एक्स, वन एक्स प्लस, डिझायर 500, डिझायर 601, सोनी एक्सपेरिया झेड, एक्सपेरिया एसपी, एक्सपेरिया टी, एक्सपेरिया व्ही, एलजी ऑप्टोमाइज जी, नेएक्सस 4, जी 2 मिनी, एल90 आणि मोटोरोला, मोटो जी, राझर एचडी, मोटो इ 2014 आणि इतर काही स्मार्टफोन्सवर व्हॉट्सअॅप नसणार आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप आता फक्त अँड्रॉइड 5.0 नवीन अँड्रॉइड फोन आणि आयओएस 12 सह नवीन आयफोन वर काम करणार आहे.
युपीआयमध्येही बदल
युपीआय व्यवहारांची मर्यादा आता दुप्पट होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) नवीन वर्षापासून युपीआय 123 पे साठी प्रति व्यवहार मर्यादा 5,000 रुपयावरून 10,000 पर्यंत वाढवेल.
प्राइम व्हिडिओमध्ये बदल
अॅमेझॉन भारतातील प्राईम व्हिडिओ वापरकर्त्यांसाठी नियम बदलत आहे. आतापर्यंत, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या एका सबक्रिप्शनवर 10 डिव्हाइसवर अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचा अॅक्सेस मिळत असे, परंतु आता केवळ 5 डिव्हाइसेसना अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचा अॅक्सेस मिळेल. ज्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 2 टीव्हीवर स्ट्रीम करू शकता. याचा अर्थ असा की नवीन वर्षात, जर एखाद्या वापरकर्त्याला एकाच वेळी 2 पेक्षा जास्त टीव्हीवर प्राइम व्हिडिओ सामग्री प्रवाहित करायची असेल तर त्याला दुसरे प्राइम खाते आवश्यक असेल.