For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ठकसेन दीपश्रीचा एजंट संदीप परबचे काय करायचे ?

06:53 AM Nov 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
ठकसेन दीपश्रीचा एजंट संदीप परबचे  काय करायचे
Advertisement

म्हार्दोळ पोलीस द्विधा मनस्थितीत : जॉब स्कॅम प्रकरणातील पीडितांच्या  जबानी नोंदणीची प्रक्रिया सुरू

Advertisement

प्रतिनिधी/ फेंड़ा

बेरोजगारांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या दीपश्री सावंत गावस प्रकरणात तारीवाडा-माशेल येथील मध्यस्थ (एजंट) बनलेला संदीप परबने केलेल्या गौप्यस्फोटात एकूण 44 जणांकडून घेतलेले सुमारे 3.88 कोटी रुपये दीपश्रीला सुपूर्द केल्याची तक्रार केल्यानंतर म्हार्दोळ पोलीस सध्या द्विधा मनस्थितीत आहेत. तक्रारदार संदीप परब याला संशयित आरोपी म्हणून वागणूक द्यावी की माफीचा साक्षीदार करावा या विवंचनेत म्हार्दोळ पोलीस सापडलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणी अजूनपर्यंत कोणावरही एफआयआर नोंदविलेला नाही.

Advertisement

जॉब स्कॅमच्या नेटवर्कात गुरफटलेल्या पीडितांची कागदपत्रे संशयिताकडे आढळलेली आहेत. याप्रकरणी मध्यस्थी करणाऱ्या संदीप जगन्नाथ परबने म्हार्दोळ पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत सविस्तर यादी जोडल्यानंतर सर्वांची झाडाझडती व जबानी नोंद करण्याची मोहीम म्हार्दोळ पोलिसांनी सुरू केली आहे.

 भुलभुलैया दीपश्रीची कोटीची उ•ाणे 44 जणांच्या मूर्खपणामुळेच

दीपश्रीने नोव्हेंबर 2023 ते एप्रिल 2024 या कार्यकाळात आरोग्य मंत्र्यांचे नाव वापरून वनखाते, नगर नियोजन खाते (टीसीपी), आरोग्य खात्यात ही सरकारी नोकरभरती करण्यात येणार असल्याचे आ़श्वासन संदीप परबला दिले होते. तक्रारीनंतर, म्हार्दोळ पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यापूर्वी परबच्या सहभागाचे मूल्यांकन करण्यासाठी 44 पीडितांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू केले आहे.

दरम्यान, फोंडा पोलिसांच्या कोठडीत असलेल्या ठकसेन दीपश्ा़dरीला 5 दिवसांचा रिमांड मिळालेला आहे. फोंडा पोलीस स्थानकात तिला हाताळण्यासाठी, जबानी इतर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी महिला पोलीस उपनिरीक्षकाची कमतरता फोंडा पोलिसांना भासत आहे. तसेच पूजा नाईक हिच्याविऊद्ध जॉब स्कॅमचा पहिला बळी ठरलेला श्रीधर सतरकर याच्या पत्नीने म्हार्दोळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. आपल्या पतीच्या आत्महत्येला पूजा नाईक जबाबदार असून तिच्यामुळेच ताणतणावानेच श्रीधर सतरकर याने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सध्या पूजा नाईक ही पर्वरी पोलिसांच्या ताब्यात आहे. पर्वरी पोलीस स्थानकातील तपास पूर्ण झाल्यावर म्हार्दोळ पोलीस पुन्हा एकदा पूजा नाईकला अटक करणार आहेत.

त्यामुळे म्हार्दोळ पोलिसांना दोन्ही जॉब स्कॅमचे प्रकरण हाताळण्यास नाकीनऊ येणार असल्याची चिन्हे दिसत आहे. त्याशिवाय ठकसेनाच्या गॉडफादरचे हस्तक्षेप झाल्यास पोलीस पारदर्शकपणे तपास कसे करणार, यावरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.

Advertisement
Tags :

.