महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

या छंदाला काय म्हणावे?

07:00 AM Oct 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोणाला कोणते छंद असतील, यासंबंधी अनुमान व्यक्त करणे अशक्य आहे. कित्येकांना असे छंद असतात, की ही माणसे असे का करतात हा प्रश्न सामान्यांच्या पडल्यावाचून रहात नाही. काही छंद हे आश्चर्यकारक असले तरी इतरांसाठी निरुपद्रवी असतात. काही छंद मात्र इतरांच्या हृदयाचा ठोका चुकवितात. अमेरिकेच्या व्हिस्काँसिस या प्रांतात वास्तव्यास असणाऱ्या टिफनी नामक एका 35 वर्षे वयाच्या महिलेला वृद्धाश्रमातल्या वृद्ध पुरुषांशी संग करण्याचा छंद आहे. अशा वयोवृद्ध आणि निवृत्त पुरुषांशी मैत्री करणे, त्यांच्यासमवेत झोपणे आणि त्यांना आपल्या प्रेमात पाडणे असा हा विचित्र छंद या महिलेने जोपासला आहे. इतकेच नव्हे, तर तिच्या अशा कृतींची छायाचित्रेही ही महिला प्रसिद्ध करते.

Advertisement

असे करण्यात तिला वेगळाच आनंद मिळतो असे तिचे म्हणणे आहे. वृद्धाश्रमात एकाकी आयुष्य कंठणाऱ्या पुरुषांना आपल्या मोहात पाडण्यातून आपल्याला एक आनंद मिळतो. अर्थातच ती या वृद्धांशी संग करण्याचा दामही वसूल करते. याचाच अर्थ असा की हा केवळ तिचा छंद असून एक भिन्न प्रकारचा व्यवसाय आहे. यातून आपला छंदही जोपासला जातो. तसेच आपल्याला मोठी कमाईही करता येते आणि या वृद्धांच्या जीवनात काही काळापुरता का असेना पण आनंद निर्माण करता येतो असे तिचे म्हणणे आहे. नैतिकतेच्या कसोटीवर तिचा छंद टिकणार नाही. तथापि, तिच्या म्हणण्यानुसार यामध्ये काहीही वावगे नाही. मागणी तसा पुरवठा अशा प्रकारचा हा व्यवहार आहे, अशी तिची भावना आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article