महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रचारासाठी वासुदेव कलाकारांचा वापर करणाऱ्या पालकमंत्र्यांचे हेच पुरोगामित्व काय?

11:35 AM Nov 15, 2024 IST | Radhika Patil
What is the progressive nature of the Guardian Minister who uses Vasudev artists for campaigning?
Advertisement

समरजितसिंह घाटगे यांचा सवाल : पायाखालची वाळू घसरल्याचेच हे द्योतक

Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी असलेल्या कागलने संपूर्ण देशाला पुरोगामित्वाचा विचार दिला. अशा भूमीत पालकमंत्र्यांना प्रचारासाठी वासुदेवाच्या वेशभूषेतील कलाकारांचा वापर करावा लागतो. हेच त्यांचे पुरोगामित्व काय? असा परखड सवाल महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी उपस्थित केला. माद्याळ (ता.कागल) येथे त्यांच्या प्रचारार्थ झालेले जाहीर सभेत बोलत होते.
पंचायत समितीचे माजी सभापती दत्तोपंत वालावलकर म्हणाले,पालकमंत्र्यांकडे या निवडणुकीच्या कालावधीत काहीही मागा सूर्य-चंद्र सोडून हे सर्व ते देतील. कागलच्या जनतेने त्यांना पंचवीस वर्षे सत्ता दिली आहे.याचा वापर त्यांनी मर्जीतील ठेकेदार, बगलबच्चे व स्वत?च्या विकासासाठी केला.त्यांना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे.

राष्ट्रीय काँग्रेसचे सुरेश कुराडे म्हणाले, गडहिंग्लज उपविभागात जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी, प्रकाश शहापूरकर,कृष्णात पाटील,बालाजी फराकटे यांच्यासह अनेक नेत्यांनी यावेळी समरजितराजेंना पाठबळ दिले आहे.याशिवाय राजेंच्या विजयासाठी अनेक अदृश्य शक्तीही काम करीत आहे.त्यामुळे समरजितराजेंचा विजय निश्चित आहे.

यावेळी आनंदभाई ढोणुक्षे ,नामदेव ढोणुक्षे ,रणजीत ढोणुक्षे ,राजाराम ढोणुक्षे, किरण ढोणुक्षे,भाऊ ढोणुक्षे,शिवाजी मुसळे व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. शिवानंद माळी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गोकुळचे माजी संचालक रणजीत पाटील,बिद्रीचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील,सागर कोंडेकर,शिवानंद माळी,रवी घोरपडे,दिग्विजय कुराडे,दयानंद पाटील,अरुण व्हरांबळे, बंटी घोरपडे,राजू घाटगे आदी मान्यवर उपस्थित होते.

                                  विकासाचे व्हिजन असलेल्या समरजितराजेंना आमदार करूया
शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे म्हणाले, कोणतेही संविधानिक पद नसताना समरजितराजेंनी कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघात कोट्यावधी रुपयांचा निधी आणला. याशिवाय राजे फाउंडेशन, राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविले. त्यांच्या ‘समरजितसिंह आपल्या दारी’ या उपक्रमाचे तर राज्यभर कौतुक झाले. शाश्वत विकासाचे व्हीजन असलेल्या समरजितसिंह घाटगे यांना आमदार म्हणून निवडून देऊया.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article