महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेस असताना ‘मनी हाइस्ट’ स्टोरीची काय गरज?

06:34 AM Dec 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

धीरज साहू यांचा उल्लेख करत मोदींचे शरसंधान

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या ठिकाणांवर सध्या छाप्यांची कारवाई सुरू आहे. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. एक व्हिडिओ रिट्विट करत त्यांनी ‘भारतात मनी हाइस्ट स्टोरीची गरज कुणाला, तुमच्याकडे काँग्रेस पक्ष आहे, जो 70 वर्षांपासून दरोड्यांसाठी प्रसिद्ध आहे’ असे नमूद केले आहे. साहू यांच्या विरोधात 6 डिसेंबर रोजी प्राप्तिकर विभागाने सुरू केलेली कारवाई मंगळवारी संपुष्टात आली आहे.

धीरज साहू यांच्या झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील एकूण 9 ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाकडून छापे टाकण्यात आले होते. या छाप्यांच्या कारवाईदरम्यान एकूण 351 कोटी रुपये रोख स्वरुपात हस्तगत करण्यात आले आहेत. प्राप्तिकर विभागाची ही कारवाई एकप्रकारे विक्रमी ठरली आहे. कुठल्याही यंत्रणेकडून एकाच ऑपरेशनमध्ये आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेली ही सर्वात मोठी रोख रक्कम आहे. प्राप्तिकर विभागाने छाप्यांच्या कारवाईची माहिती ईडीला दिली आहे. आता ईडीकडून साहू यांच्याविरोधात चौकशी होण्याची शक्यता आहे.

बलांगीर आणि टिटिलागढ येथून 310 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. मद्याच्या भट्ट्यांवरून ही मोठी रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. याप्रकरणी तपास सुरू असून साहू ग्रूपवर करचोरीचा आरोप झाला आहे. रोख रक्कम जप्त करण्यासाठी अधिकाऱ्यांना एकूण 176 बॅगचा वापर करावा लागला आहे. रोख रकमेची मोजणी करण्यासाठी कर आणि विविध बँकांच्या सुमरो 80 अधिकाऱ्यांच्या 9 पथकांना नियुक्त करण्यात आले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article