काय आहे रॅट टॉर्चर?
लोकांचा व्हायचा वेदनादायी अंत
भारतासमवेत विविध देशांमध्ये मृत्युदंडासंबंधी वेगवेगळे कायदे आहेत. या कायद्यांच्या अंतर्गतच त्या देशात गुन्हेगाराला शिक्षा दिली जाते. रॅट टॉर्चर हा देखील शिक्षेचा एक प्रकार आहे. पृथ्वीवर मृत्युदंड ही सर्वात मोठी शिक्षा आहे, काही देशांमध्ये मृत्युदंडासाठी फासावर लटकविले जाते. तर काही देशांमध्ये गोळ्या घालून ठार केले जाते.
भारतात इंग्रज अन् मुगलांचे राज्य असताना ते स्वत:च्या मर्जीनुसार कैद्यांना शिक्षा द्यायचे. यातील एका शिक्षेत कैद्यांवर भूकेल्या उंदरांना सोडले जायचे, ज्यानंतर त्रस्त होत कैदी स्वत:कडील रहस्य उघड करत होता. अनेक चित्रपटांमध्ये कैदी किंवा आरोपींवर उंदिर सोडताना तुम्ही पाहिले असेल. फास्ट अँड फ्यूरियस आणि गेम्स ऑफ थ्रोन्समध्ये देखील रॅट टॉर्चरशी निगडित दृश्य दाखविण्यात आले आहे. यादरम्यान उपाशी उंदरांना कैद्यांच्या पोट अन् छातीवर एका बादलीत भरून उंदिर सोडले जातात. यानंतर बादलीला बाहेरून गरम केले जाते, यामुळे उत्तेजित होत उंदिर कैद्याच्या शरीराचे मांस चावू लागतो. ही किती धोकादायक अन् क्रूरतायुक्त शिक्षा असेल हे यातून स्पष्ट होते. परंतु कुठल्याही देशात अशाप्रकारची शिक्षा जाहीरपणे दिली जात नाही.
बहुतांश देशांमध्ये सद्यकाळात फाशी किंवा गोळी झाडून मृत्युदंडाची अंमलबजावणी केली जाते. भारतासह मलेशिया, बार्बाडोस, बोत्सवाना, टांझानिया, जाम्बिया, झिम्बाम्बे, दक्षिण कोरिया देशांमध्ये फाशीची तरतूद आहे. तर येमेन, टोगो, तुर्कमेनिस्तान, थायलंड, बहारीन, चिली, इंडोनेशिया, घाना, आर्मेनिया यासारख्या देशांमध्ये गोळी झाडून ठार करण्याची तरतूद आहे.