ओलाचे शून्य कमिशन मॉडेल काय आहे?
याचा काय व किती होणार लाभ?
नवी दिल्ली :
भारतातील आघाडीची राइड-हेलिंग कंपनी ओलाने अलीकडेच त्यांच्या ड्रायव्हर पार्टनर्ससाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. यासाठी कंपनीने देशभरात शून्य कमिशन मॉडेल लागू केले आहे. ज्याचा थेट फायदा कॅब चालकांना होईल. या नवीन मॉडेल अंतर्गत, चालकांकडून कोणतेही कमिशन आकारले जाणार नाही. कंपनीच्या या निर्णयाने चालक खूपच उत्साहित आहेत. याशिवाय, या घोषणेमुळे राइड-हेलिंग उद्योगही हादरला आहे.
ओला, उबर सारख्या सर्व राइड-हेलिंग कंपन्या प्रत्येक राइडसाठी चालकांकडून कमिशन आकारतात. ते सहसा 20-30 टक्केपर्यंत असू शकते. या कमिशनमुळे, चालकांच्या कमाईवर परिणाम होतो. म्हणूनच चालकांना अधिक फायदे देण्यासाठी ओलाने शून्य कमिशन मॉडेल आणले आहे.
नवीन मॉडेल अंतर्गत, चालकांना प्रति राइड कोणतेही कमिशन द्यावे लागणार नाही. याशिवाय, ओला प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी आता चालकांकडून निश्चित दैनिक किंवा मासिक कमिशन आकारले जाईल. म्हणजेच, ड्रायव्हर्सना प्रत्येक राईडमधून मिळणारी संपूर्ण कमाई ठेवता येईल, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल. ओलाचे हे नवीन मॉडेल ऑटो बाईक आणि कॅब सेवेवर लागू होईल.
ओलाचे शून्य कमिशनमॉडेल कसे काम करेल?
प्रत्येक राईडसाठी चालकांना आता कंपनीला कोणताही हिस्सा द्यावा लागणार नाही. राईडचे संपूर्ण भाडे चालकाच्या खात्यात जाईल, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल. कंपनीने हे देखील सुनिश्चित केले आहे की या नवीन मॉडेलचा प्रवाशांच्या सुरक्षिततेवर आणि सेवेवर परिणाम होणार नाही आणि ते पूर्वीपेक्षा चांगले राहील. या निर्णयामुळे ड्रायव्हरचे मासिक उत्पन्न 20 ते 30 टक्केपर्यंत वाढू शकते. ओलाच्या नवीन व्यवसाय मॉडेलबद्दल ड्रायव्हर्स खूप उत्सुक आहेत. यामुळे ते चांगले काम करतील.
शून्य कमिशन मॉडेलसह आव्हाने
- या नवीन शून्य कमिशन मॉडेलमुळे कमी राईड घेणाऱ्या ड्रायव्हर्ससाठी जास्त निश्चित शुल्क आकारले जाऊ शकते.
इतर कंपन्यादेखील हेच मॉडेल स्वीकारू शकतात, ज्यामुळे ओलाला त्यांची रणनीती आणखी सुधारण्यास भाग पाडू शकते.
कमिशन उत्पन्न बंद झाल्यामुळे ओलाची आर्थिक स्थिती प्रभावित होऊ शकते.