For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ये हृदयीचे ते हृदयी

06:56 AM Sep 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
ये हृदयीचे ते हृदयी
Advertisement

माणसाच्या जगण्यात हृदयाचे स्थान मध्यवर्ती आहे. आईच्या उदरात तयार झालेले हृदय माणूस शतायू होईपर्यंत अखंड कार्यरत असते. माणसाचे अद्भुत शरीर तयार करण्याची परमात्म्याची कला आपल्या आकलनशक्तीपलीकडे आहे. हृदय कधीही दमत नाही. विसावा घेत नाही. थांबत नाही. एका लयीत आयुष्यभर त्याचे काम चाललेले असते.

Advertisement

गर्भवती स्त्राrला जी इच्छा होते तिला मराठीत डोहाळे आणि संस्कृत भाषेत दोहद असे म्हणतात. दोहद याचा अर्थ दोन हृदयांची इच्छा. गर्भवती स्त्राrला दोन इच्छा असतात. एक तिची व एक तिच्या उदरस्थ बाळाची. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘गर्भाचे आवडी मातेचा डोहळा.’ आईचे व बाळाचे हृदय एक होते तेव्हा आईला वांत्या होतात असे पुराणात म्हटले आहे. बाळाचा आणि आईचा दोघांचा हृदयाशी जवळचा संबंध आहे. आईने हृदयाशी धरले की अपत्य वयाने कितीही मोठे असो, त्याची तगमग शांत होते. माणसाच्या जगण्यात हृदयाचे स्थान मध्यवर्ती आहे. आईच्या उदरात तयार झालेले हृदय माणूस शतायू होईपर्यंत अखंड कार्यरत असते. माणसाचे अद्भुत शरीर तयार करण्याची परमात्म्याची कला आपल्या आकलनशक्तीपलीकडे आहे. हृदय कधीही दमत नाही. विसावा घेत नाही. थांबत नाही. एका लयीत आयुष्यभर त्याचे काम चाललेले असते. शरीरामधल्या कोणत्याही अवयवाचे बिनसले तरी सर्वात आधी तपासणी होते ती हृदयामधल्या ठोक्यांची. हृदयाची धडधड शरीराची आणि मनाची स्थिती सांगत असते.

मराठी भाषेने हृदयाला प्राणपणाने जपले आहे. पंचकोषांच्या आत असणारा कुटस्थ म्हणजे परमात्मा. याचे द्वार हृदय आहे असे म्हणतात. माणसाला जगवणारे अमृतच जणू हृदयात आहे. कारण हृदयातूनच प्रेमाचा उगम आहे. मनुष्य शरीरात सात चक्रे आहेत असे अध्यात्मशास्त्रात म्हटलेले आहे. मूलाधार चक्रापासून सहस्रधार चक्रापर्यंत जाणारी एक शिडी माणसाच्या शरीरात आहे. ओशो रजनीश म्हणतात, जागृती ही चक्र माध्यमातून येते. मूलाधार चक्रात स्त्राr, पुरुष यांचा देह लक्षात राहतो. स्वाधिष्ठानचक्रातून पाहिले तर देह न दिसता मन दिसते. मणिपूरचक्रातून आत्मा दिसतो. चौथे चक्र आहे ते अनाहतचक्र. म्हणजे हृदय. अनाहत चक्रातून जो बघतो तो वासनेतून मुक्त होतो. त्याच्या जीवनात प्रेमाचा आविर्भाव होतो. त्याला स्त्राr, पुरुष, देह, मन, आत्मा असे न दिसता फक्त परमात्मा दिसू लागतो. संत मीराबाई म्हणतात, ‘म्हारो जनम मरन को साथी, थाने नही बिसरु दिन राती, तुम देख्या बिन कल न पडत है, जानत मेरी छाती.’ हे परमात्मा, माझे हृदय जाणते की तुला बघितल्याशिवाय मला क्षणभरही चैन पडत नाही. डोळे बंद करून मी तुला हृदयात बघून घेते. संत जनाबाई म्हणतात, ‘धरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला’ हा विठुराया चित्तचोर आहे. त्याने माझे मन चोरले म्हणून त्याला भक्तीच्या दोराने गळ्याला बांधले आणि हृदयाच्या बंदीखान्यात कोंडून टाकले. हा कधी निसटून जाईल याचा नेम नाही. अध्यात्मशास्त्रात मराठी भाषेमध्ये अनेक वाक्प्रचार रूढ आहेत. सहृदयी, पाषाणहृदयी, कोमलहृदयी अशी स्वभाववैशिष्ट्यो सांगतात. माणसाचे हृदयपरिवर्तन होते, तर हृदयावर दगड ठेवून काही गोष्टी कराव्या लागतात. हृदय हेलावते, पाघळते, प्रकाशते, भरून येते, सद्गदित होते, हृदयाचे हृदयाशी नाते जोडले जाते, हृदय जळते सुद्धा. समर्थ रामदास स्वामी करुणाष्टकात म्हणतात, ‘जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी.’ मनुष्यजन्माचे मूल्य जाणून परमेश्वराच्या कृपेची केलेली मागणी म्हणजे करुणाष्टक आहे. समर्थांना ‘समुदायाचा हव्यास’ आहे. समर्थांची ही मागणी फक्त स्वत:साठी नाही तर सर्वांसाठी आहे.

Advertisement

श्री रामरक्षा स्तोत्रामध्ये ‘रामरक्षा कवच’ आहे. यात म्हटले आहे की ‘हृदयं जामदग्नजीत.’ श्रीराम हे कोमलहृदयी आहेत. त्यांनी जमदग्नी ऋषींचे पुत्र परशुराम यांच्या हृदयातील क्रोध नाहीसा केला. आमच्याही हृदयामध्ये अनाठायी क्रोध निर्माण होणार नाही व दया, क्षमा, शांती असे भाव हृदयात निर्माण व्हावेत ही श्रीरामांना प्रार्थना आहे. श्री रामरक्षा रहस्य या सर्वांगसुंदर ग्रंथांमध्ये लेखक डॉ. रघुनाथ शंकर घाटे म्हणतात, ‘जानकीला परशुरामांनी दिलेल्या कार्मुक या शिवधनुष्यावर श्रीरामांनी प्रत्यंचा चढवताच ते मोडून पडले आणि त्याचे तुकडे झाले हे समजताच परशुराम अत्यंत क्रोधाविष्ट होऊन मिथिला नगरीकडे निघाले. अयोध्येकडे सहकुटुंब निघालेल्या राजा दशरथ महाराजांची त्यांची वाटेत भेट झाली. परशुरामांना बघून सारेच भयभीत झाले. प्रभू रामचंद्र मात्र शांतपणे त्यांच्याकडे बघत राहिले. प्रभू रामचंद्राने क्रोधीत परशुरामांवर शांततेचा एक झोत योगमायेने सोडला. तक्षणी परशुराम शांत झाले. श्रीरामांच्या केवळ दृष्टिक्षेपाने क्रोधाने भरलेले परशुरामांचे हृदय शांत शीतल झाले. श्रीरामांनी आपलेही हृदय भयरहित व प्रसन्न ठेवावे म्हणून ही प्रार्थना करायची.

सीतामातोश्रींचे ध्यान केले की आपोआप श्रीरामांचे ध्यान घडते आणि हनुमंताचे ध्यान केले की श्रीरामांचे दर्शन होते. श्री हनुमानचालिसामधील सुप्रसिद्ध दोहा असा आहे- ‘पवन तनय संकट हरण मंगल मूरती रूप, राम लखन सीतासहित हृदय बसहु सुर भूप’. संत तुलसीदास म्हणतात, ‘हे पवनपुत्र हनुमान, तुम्ही सर्व संकटांचे हरण करणारे, मंगलाचे मूर्त स्वरूप आहात. माझी प्रार्थना आहे की राम-लक्ष्मण-सीतासहित तुम्ही माझ्या हृदयात वास करा.’

भारतीय संस्कृतीने नदीला लोकमाता म्हणून तिचा सन्मान केला. तिला स्त्राr म्हणून सगुण रूपात तिची पूजा बांधली. श्रीकृष्ण आणि यमुना यांचे अतूट नाते आहे. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहात असणाऱ्या विषारी कालिया नागाचे मर्दन करून त्याला हद्दपार केले. कालियाने यमुनेचा डोह नासवला आणि गोकुळवासियांवर प्राणसंकट आणले म्हणून त्याचा पराभव व्हायलाच हवा असे सर्वांना वाटते. परंतु ज्ञानेश्वर महाराजांना दिसते ती दु:खी असलेली नदीरूपी स्त्राr. तिच्या हृदयात काट्याप्रमाणे सलणारा कालिया नाग होता. कालिंदीला दु:खमुक्त करणे हा श्रीकृष्णाचा एक हेतू होता. म्हणून माऊली म्हणतात, ‘कालिंदीचे हृदयशल्य फेडिले..’ श्रीकृष्णाची कृती दैवी, पण हेतू मानवी होता. श्री दत्तप्रभूंचा वास हा कृष्णातीरी आहे. श्री क्षेत्र वाई हे कृष्णामाईंचे मुख. नरसोबाची वाडी तिचे हृदय आहे. कुरवपूर क्षेत्र हे नाभीस्थान आहे. साक्षात दत्तप्रभू जिथे नांदतात त्या श्रीक्षेत्र नरसोबावाडी, औदुंबर येथे हृदय भरून आणि हृदयातून कृष्णामाईंचे प्रेम वाहते आहे.

श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात म्हणतात, श्रीकृष्णाने आपला कंकणयुक्त उजवा बाहू पसरून आपल्याला शरण आलेल्या भक्तश्रेष्ठ अर्जुनाला अलिंगन दिले. जे वाचेला व बुद्धीला प्रवेश करण्यास कठीण ते देण्यासाठी कृष्णाने अलिंगनाचे निमित्त केले आणि ‘हृदया हृदय एक जाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडता केले, आपणा ऐसे अर्जुना..’ श्रीकृष्ण व अर्जुन यांचे हृदय एक झाले. देव-भक्त हे द्वैत न मोडता अर्जुनाला आपल्यासारखे केले. देवाला हृदयातून हाक घातली की तो हृदयस्थ होतो यात शंकाच नाही.

स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :

.