काय असते डर्टी वेलनेस?
फिट राहण्यासाठी जगभरात हा ट्रेंड होतोय फॉलो
जगात काही ना काही नवे घडत असते आणि नवा ट्रेंड नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. फॅशनपासून म्युझिक आणि फिटनेस ट्रेंड वेगाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फॉलो केला जातो. मागील काही दिवसांपासून एक नवा ट्रेंड दिसून येत असून याला ‘डर्टी वेलनेस’ नाव देण्यात आले आहे. फिट राहण्यासाठी ‘बॅक टू बेसिक’च्या थीमवर आधारित हा ट्रेंड अत्यंत आकर्षक असून लोक फिट राहण्यासाठी याला दैनंदिन जीवनाचा हिस्सा करत आहेत. खासकरून मानसिक आरोग्यासाठी हे अत्यंत प्रभावी मानले जात आहे.
2022 मध्ये डर्टी वेलनेसला नंबर वन ट्रेंड मानले गेले होते. लोकांनी आता डर्टी वेलनेसद्वारे स्वत:चे शारीरिक अन् मानसिक आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न चालविला आहे. या फिटनेस ट्रेंडमध्ये निसर्गावर लक्ष केंद्रीत केले जाते आणि त्याच्याशी जोडून घेत स्वत:ला तंदुरुस्त ठेवले जाते.
आमचे पूर्वज जमिनीशी जोडूनच राहत होते, भले मग तो शेतकरी असो किंवा जंगलात राहणारे लोक. परंतु विकासासोबत जंगलांची जागा उंच इमारतींनी घेतली आणि आम्ही मातीपासून दूर होत गेलो. याचबरोबर लोकसंख्या आणि प्रदूषणामुळे मातीने स्वत:ची उत्पादकता गमाविली. आता त्याच्या जागी रसायने आली असून याचा प्रभाव आमच्या मानसिक आरोग्यावरही पडला आहे. तणाव आणि नैराश्य याचाचा परिणाम आहे.
मड बाथची वाढती लोकप्रियता
बागकाम म्हणजेच गार्डनिंग करणाऱ्या लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर याचा मोठा प्रभाव दिसून आला आहे. गार्डनिंगमुळे फिट राहण्यास मदत मिळते आणि यामुळे निसर्गाच्या नजीक जाण्याची संधी मिळते. जीवनात बदलासाठी हा ट्रेंड अवलंबिणारे लोक मातीसोबत खेळतात आणि अनवाणी पायांनी गवतावर चालतात. हे नवे नाही, परंतु या आधुनिकतेच्या धावपळीत सर्व विसरून गेले आहे, स्वत:ला मातीत बागडवून घेणे आमच्या आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पाडते.
माती आमच्या इकोसिस्टीममधील सर्वात खास गोष्ट मानली जाते आणि माणसांनी याच्याशी जोडले जाणे अत्यंत आवश्यक आहे. याचमुळे सद्यकाळात मड बाथ आणि सॉइल बाथ यासारखे ट्रेंड दिसून येत आहेत. लोक स्वत:च्या घरांमध्ये गार्डनिंग करतात, छोटे-छोटे फार्म तयार करतात, जेणेकरून कुठल्या न कुठल्या प्रकारे मातीशी जोडलेले राहता येईल. या ट्रेंडनुसार जिममध्ये घाम गाळण्यापेक्षा अधिक चांगले सकाळी गवतावर अनवाणी पायांनी फिरणे असल्याचे मानले गेले आहे.
अनवाणी पायांनी गवतावर, चिखलतात चालण्याचे लाभ दर्शविणारी अनेक अध्ययनं करण्यात आली आहेत. याचबरोबर स्वत:ची झोप सुधारून आणि दिनचर्या नीट करूनही फिट राहता येते. यामुळे शारीरिक तणावासोबत मानसिक तणाव अन् नर्व्हस सिस्टीमवरही प्रभाव पडतो. मड बाथमुळे मोठी मदत मिळत असते.