बुडविण्यात जी मजा, ती पकडण्यात कुठे!
इराणी युद्धनौकांवरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचे उद्गार
अमेरिका-इस्रायल आणि इराणदरम्यान मागील 10 दिवसांपासून जारी युद्धादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य चर्चेत आहे. मंगळवारी युद्ध जवळपास संपुष्टात आल्याचा दावा करणाऱ्या ट्रम्प यांच्या एका वक्तव्याची निंदा केली जात आहे. युद्धादरम्यान मागील आठवड्यात अमेरिकेच्या पाणबुडीने हल्ला करत इराणी युद्धनौका ‘आयआरआयएस डीईएनए’ला बुडविण्यात आले होते. याप्रकरणी ट्रम्प यांनी अजब वक्तव्य केले आहे.
युद्धनौकांना पकडण्यापेक्षा अधिक मजेशीर त्यांना नष्ट करणे आणि बुडविण्यात आले आहे. शत्रूच्या युद्धनौका बुडविणे अधिक मजेशीर आहे. मला युद्धनौका बुडविणे अधिक पसंत असल्याचे उद्गार ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सैन्यासोबतच्या संभाषणावेळी काढले आहेत.
इराणचे 87 नौसैनिक ठार
इराणी युद्धनौका आयआरआयएस डीईएनए भारताकडून आयोजित ‘मिलन’ बहुपक्षीय सागरी युद्धाभ्यासात भाग घेऊन मायदेशी परतत असताना अमेरिकेच्या नौदलाने तिला लक्ष्य केले होते. या हल्ल्यात कमीतकमी 87 इराणी नौसैनिक मारले गेले होते. इराणने या हल्ल्याची कठोर निंदा केली होती आणि प्रत्युत्तर देण्याची शपथ घेतली होती. इराणचे उपविदेशमंत्री सईद खतीबजादेह यांनी अमेरिकेने आंतरराष्ट्रीय कायद्याचे मनमानी पद्धतीने उल्लंघन केल्याचे म्हणत या हल्ल्याची शिक्षा अवश्य दिली जाणार असल्याचा इशारा दिला होता.
46 युद्धनौका नष्ट केल्याचा दावा
ऑपरेशन फ्यूरी इराणच्या सैन्य सुविधांना जोरदार झटके देत आहे. आम्ही इस्रायली भागीदारांसोबत मिळून तांत्रिक कौशल्य आणि सैन्यशक्तीचे जबरदस्त प्रदर्शन करत शत्रूला चिरडत आहोत. इराणची ड्रोन अन् क्षेपणास्त्र क्षमता नष्ट केली जात आहे. इराणचे नौदल संपले असून समुद्राच्या तळाला पोहोचले आहे. इराणच्या 46 युद्धनौका बुडाल्या आहेत असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.