For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime | कोल्हापुरात मध्यरात्री दीड वाजता नेमकं काय घडलं? २० जणांच्या टोळीने घातलेल्या 'त्या' भयाण थैमानाची Inside Story!

10:21 AM Jun 03, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime   कोल्हापुरात मध्यरात्री दीड वाजता नेमकं काय घडलं  २० जणांच्या टोळीने घातलेल्या  त्या  भयाण थैमानाची inside story
Advertisement

                                        कोल्हापुरात मध्यरात्री गुंडांचा धुमाकूळ

Advertisement

कोल्हापुर - शिवाजी पेठेतील एका महाविद्यालयात गंजीमाळ येथील तरुणांचा जवाहरनगरमधील तरुणांसोबतबाद झाला होता. यातुन सकाळीहाणामारीची घटना घडली. हा वाद मिटणं अपेक्षित असताना. त्याचे पडसाद गंजीमाळ परिसरात उमटले.मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास७ ते ८ दुचाकीवरून आलेल्या २० तरुणांनी धारधार शस्त्रांसह गंजीमाळ परिसरात दहशत माजवत या परिसरातघरांच्या दारात लावलेल्या चारचाकी,तीनचाकी आणि दुचाकींना लक्ष करत
वाहनांची तोडफोड केली. या गुंडांच्या टोळक्याचा मध्यरात्रीपासूनच जुना राजवाडा पोलीस शोध घेत होते.

यात बाराजणांसह अनोळखी सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळपर्यंत ७ ते ८ जणांना ताब्यात घेतलं असून, रात्री उशीरा पर्यंत त्यांना अटक करण्याची प्रक्रीया चालू होती.माजी नगरसेवक रामदास भाले यांच्या नातेवाईकांच्या दोन चारचाकींची या तरुणांनी तोडफोड केली. दरम्यान रामदास भाले आणि त्यांच्या कुटुंबियांनी आरडाओरडा केल्यामुळं हे टोळकं पसार झालं, अन्यथा आणखी दहा वाहनांना त्यांनी लक्ष केलं असतं. तसंच त्यापुढे जावून प्रदीप घोरपडे यांच्या दारातील चारचाकीलाही या टोळक्यानं लक्ष केलं.

Advertisement

घोरपडे यांचे भाचे कुटुंबियांसहीत पुण्याहून काल रात्रीच गंजीमाळ येथे आले होते. त्यांच्याही वाहनाला लक्ष केल्यानं, कुटुंबियांनी या दहशती विरोधात नाराजी व्यक्त केली. तिथून हे टोळकं पुढं गेलं. शेतकरी संघाच्या जागेत असलेल्या झोपडपट्टीतील ओंकार माने यांची इको, वैभव तोडकर यांची पॅ त्र्शन आणि अॅपे, तानाजी राजहंस यांची इको, तर युवराज सुतार यांच्या इनोव्हा गाडीला लक्ष करत, या टोळक्यानं त्या वाहनांची तोडफोड केली.

एकंदरीत या परिसरातील ओंकार गुरव, मयूर बचाटे, गोरखनाथ गुरव, विकी कांबळे, आय्याज शेख, जयवंत मोहिते, अनिल भाले यांच्या दुचाकी आणि चारचाकी अशा १७वाहनांना लक्ष करून त्यांचं प्रचंड नुकसान केलं.
दरम्यान माजी नगरसवेक भाले आणि प्रदीप घोरपडे यांनी ११२ क्रमांक तसेच जुना राजवाडयाचे निरीक्षक किरण लोंढे यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर अवघ्या काही वेळात शहरच्या पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, निरीक्षक किरण लोंढे, याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील तसेच जुना राजवाड्याचे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी घटनास्थळी पोचले. स्थानिक नागरिकांकडून या घटनेची माहिती घेतली.

तसेच सीसीटीव्हीद्वारे पहाटेपासूनच दहशतखोरांची ओळख पटवून पोलिसांकडून शोध घेण्याचं काम सुरू होतं. याबाबत सिध्देश विनायक कांबळे (वय २३, रा. टिंबर मार्केट, गंजीमाळ, शिवाजी पेठ, कोल्हापूर) याने दिलेल्या फिर्यादी वरून मंगळवारी सायंकाळपर्यंत या प्रकरणातील ७ ते ८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांना पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर या सर्वांनी गुन्हयाची कबुली दिली. त्यांच्या अटकेची प्रक्रीया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. याबाबत सपोनि अशोक चव्हाण हे अधिक तपास करत आहेत.

Advertisement
Tags :

.