For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Panhala Municipal Council | कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नेमका कशाचा स्फोट झाला? पन्हाळ्यावरील भीषण आगीचे गूढ काय?

01:21 PM Jun 01, 2026 IST | NEETA POTDAR
panhala municipal council   कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नेमका कशाचा स्फोट झाला  पन्हाळ्यावरील भीषण आगीचे गूढ काय
Advertisement

                              पन्हाळा घनकचरा प्रकल्पाला भीषण आग

Advertisement

पन्हाळा - पन्हाळा येथील नगरपरिषदेच्या घनकचरा प्रकल्प येथे असणाऱ्या कचऱ्याला दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागली. बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात धुराचे लोट पसरले.दरम्यान नगरपरिषदेच्या अग्निशमन गाडीच्या मदतीने कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले.

पन्हाळा नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्प येथे नगरपरिषदेकडून घंटागारीच्या द्वारे घरोघरी गोळा केलेला कचरा आणून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. यामध्ये सुका कचरा व ओला कचरा वेगवेगळे केला जातो. त्यामुळे घंटागाडी द्वारे आणलेला कचरा हा एका ठिकाणी साठवला जातो.

Advertisement

याच कचऱ्याला आज अचानक आग लागली. नेमकी आग कशी लागली हे स्पष्ट झाले नसले तरी कचऱ्यात काहीतरी स्फोटक पदार्थ असल्याने त्याला उन्हाच्या तडक्याने जास्तचउष्णता मिळाल्याने ही आग लागली असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

या आगीचे भीषणता एवढी होती की पन्हाळ्याच्या पूर्व पायथ्याशी असलेल्या गावांनाधुराचे लोट दिसत होते. या धुरामुळे पन्हाळ्याच्या वातावरण दूषित झाले होते. आगीचे रौद्ररूप त्यात धुराची लोट यामुळे श्वास घेणे मुश्कील असताना देखील नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण आणण्यासाठी मोठ्या धाडसाने नाकाला व तोंडाला रुमाल बांधून आग विझवण्याचे प्रयत्न केल्यानेच पुढील मोठा अनर्थ टळला.

Advertisement
Tags :

.