महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी काय दिले?

11:26 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शहापूर परिसरातील दौऱ्यावेळी भाजप-निजदचा सवाल, जगदीश शेट्टरांचा जोरदार प्रचार

Advertisement

बेळगाव : राज्यात पाच गॅरंटी योजना आणणाऱ्या काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांसाठी ठोस एकाही योजनेची अंमलबजावणी केली नाही. राज्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही कर्जमाफी केली नाही. शेतकरी दुष्काळामुळे होरपळत असतानाही कर्जमाफी देण्यात आलेली नाही. कर्जमाफी करण्यासाठी केंद्राच्या अनुदानाची गरज नसते. त्यामुळे काँग्रेसने राज्यातील शेतकऱ्यांना काय दिले? असा सवाल माजी सहकारमंत्री बंड्याप्पा काशमपूर यांनी केला. काँग्रेसने गेल्या वर्षभरात गॅरंटी स्कीम वगळता कोणतेही विकासात्मक धोरण ठरविलेले नाही. गेल्या वर्षी गॅरंटी योजनांसाठी राज्य सरकारने एक लाख कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. यामुळे हा भार राज्यातील जनतेवरच पडणार आहे. माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी आपल्या काळात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली. काँग्रेसच्या बहुतांश मंत्र्यांनी निवडणुकांना सामोरे न जाता कुटुंबीयांना निवडणुकीमध्ये उभे केले असल्याचे बंड्याप्पा काशमपूर यांनी सांगितले. यावेळी जेडीएसचे जिल्हाध्यक्ष शंकर मडलगी, भाजपच्या महानगर अध्यक्षा गीता सुतार, जेडीएसचे प्रवक्ता सी. एन. नागराज यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. गुरुवारी रात्री जगदीश शेट्टर यांनी शहापूर परिसरात प्रचार दौरा राबविला. यावेळी नागरिकांना मोदी यांने राबविलेल्या योजनांची माहिती दिली. मोदी देशासमोरचा सर्वात आश्वासक चेहरा असून जगात कुठेही गेलात तरी नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाला मान मिळाला आहे. त्यामुळे ही पत जगभरात कायम ठेवण्यासाठी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी पोहोचविण्यासाठी भाजपला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी नगरसेवक गिरीश धोंगडी, चंद्रशेखर बेंबळगी यांच्यासह इतर उपस्थित होते.

Advertisement

 केएलई महाविद्यालयात लोकसभा

जगदीश शेट्टर यांनी शुक्रवारी सायंकाळी केएलई महाविद्यालयात लोकसभा घेतली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रभाकर कोरे, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवठगीमठ, प्राचार्य एस. ए. पाटीलसह इतर उपस्थित होते. भ्रष्टाचारमुक्त देश करून अनेक उद्योगधंदे आणण्यात मोदींचा मोलाचा वाटा आहे. युपीए सरकारमधील अनेक घोटाळे पंतप्रधानांनी बाहेर काढले आहेत. पेट्रोलसोबत इथेनॉलचा वापर करून देशात नवक्रांती घडविली आहे. त्यामुळे भाजपलाच मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

जगदीश शेट्टर यांची भरतेश शिक्षण संस्थेला भेट

भाजपचे बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी शुक्रवारी भरतेश शिक्षण संस्थेला भेट दिली. संस्थेतील कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक यांना भाजपलाच मतदान करण्याचे आवाहन शेट्टर यांनी केले. नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ कारभार करून देशाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. हीच कार्यपद्धती यापुढेही राबविण्यासाठी भाजपचे हात बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी संस्थेचे सदस्य विनोद दो•ण्णावर, डॉ. सावित्री दो•ण्णावर, श्रीकांत खेमलापुरे, अशोक दानवडे यासह इतर उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article