For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वक्फ मालमत्तेच्या चोरीचे काय ?

02:26 AM Jul 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
वक्फ मालमत्तेच्या चोरीचे काय
Advertisement

योगी आदित्यनाथ यांचा सप, काँग्रेसला प्रश्न

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ (उत्तर प्रदेश)

जे राजकीय पक्ष आज राम मंदिरातील कथित अपहारासंबंधी गळा काढत आहेत, त्यांनी वक्फ मालमत्तेच्या गैरव्यवहारांविषयी तोंडात मिठाची गुळणी धरली आहे. यग विषयावर वक्तव्य करण्यास ते धजावतील काय, असा प्रश्न उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थित केला आहे. राम मंदिराच्या संदर्भात विरोधी पक्षांची भूमिका दुतोंडी आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Advertisement

उत्तर प्रदेशात प्रतापगढ येथे एका प्रकट सभेत त्यांनी मंगळवारी भाषण केले. वक्फच्या नावावर अनेक मालमत्तांचा घोटाळा विरोधी पक्षांच्या सत्ताकाळात झाला आहे. वक्फच्या नावावर सरकारी आणि खासगी भूखंड हडप करण्यात आले आहेत. ही प्रकरणे आता बाहेर पडत आहेत. हजारो हेक्टर भूमी वक्फच्या नावे विकली गेली आहे. जी भूमी गरीबांना त्यांच्या पोटापाण्यासाठी मिळणे आवश्यक होते, ती पैशासाठी काही श्रीमंतांना विकली गेली. हे बेकायदेशीर व्यवहार वक्फच्या नावावर करण्यात आले. तरीही काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांनी या अपहारांविषयी सोयीस्कर मौन बाळगले आहे. या मौनाचे कारण त्यांनी स्पष्ट करावे. विरोधी पक्ष राम मंदिरातील अपवादात्मक प्रसंगांचे भांडवल करत आपला राजकीय स्वार्थ साधू पहात आहेत. मात्र, वक्फच्या शेकडो कोटी रुपयांच्या घोटाळ्यांवर यांची ‘अळीमिळी गुप चिळी’ आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

रामविरोधकांची दांभिकता

आदित्यनाथ यांनी विरोधी पक्षांवर राम मंदिराच्या संदर्भात दांभिकतापूर्ण वर्तणूक करीत असल्याचा आरोप केला. जगातील सर्व हिंदूंसाठी भगवान असणारे प्रभू रामचंद्र अस्तित्वातच नव्हते, अशी भूमिका काँग्रेसची आहे. काँग्रेसप्रणित सरकारने प्रभू रामचंद्रांचे अस्तित्व नाकारणारे एक प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले असून, त्यात हे प्रतिपादन करण्यात आले आहे. आता मात्र, राम मंदिरातील अपवादात्मक प्रसंगांचे भांडवल करुन हे पक्ष राजकीय स्वार्थासाठी रामाचा आधार घेत आहेत. अयोध्येत करसेवा करण्यासाठी देशभरातून जमलेल्या करसेवकांवर ज्यांनी निर्घृण गोळीबार केला, असा प्रत्यारोप योगी आदित्यनाथ यांनी केला आह.s

Advertisement
Tags :

.