For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महावितरणच्या गो ग्रीन योजनेत पश्चिम महाराष्ट्र आघाडीवर

04:54 PM Dec 23, 2023 IST | Kalyani Amanagi
महावितरणच्या गो ग्रीन योजनेत पश्चिम महाराष्ट्र आघाडीवर
Advertisement

1.72 लाख वीज ग्र्राहकांकडून 2 कोटी 6 लाख रूपयांची वार्षिक बचत

Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

महावितरणच्या पश्चिम महाराष्ट्रातील 1 लाख 72 हजार 450 वीजग्राहकांनी केवळ ‘ई-मेल‘ व ‘एसएमएस‘चा पर्याय निवडला आहे. या वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन‘ योजनेला प्रतिसाद दिल्याने त्यांची तब्बल 2 कोटी 6 लाख 94 हजार रुपयांची वार्षिक बचत होत आहे. या योजनेत आतापर्यंत राज्यातील 4 लाख 35 हजार 902 ग्राहकांनी सहभाग घेतला आहे. यातील सर्वाधिक 39.6 टक्के ग्राहक पश्चिम महाराष्ट्रातील आहेत.

Advertisement

महावितरणच्या ‘गो-ग्रीन‘ योजनेनुसार ‘ई-मेल‘ व ‘एसएमएस‘चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वार्षिक 120 रुपयांची बचत होत आहे. ‘गो-ग्रीन‘ योजनेत सर्व लघुदाब ग्राहकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे. ‘गो-ग्रीन‘ योजनेत सहभागी कोल्हापूरमधील 15 हजार 457 ग्राहकांचे 18 लाख 54 हजार 840 रुपयांची वीजबिलात वार्षिक बचत होत आहे. वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन‘ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी महावितरणचे मोबाईल ॲप किंवा www.mahadiscom.in संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.

Advertisement
Tags :

.