विंडीज महिला संघाला दंड
06:22 AM Apr 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ सेंट किट्स
Advertisement
सध्या यजमान विंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात विंडीज संघाला षटकांची गती राखता न आल्याने त्यांना आयसीसीने दंड ठोठावला आहे.
या मालिकेत ऑस्ट्रेलियाने विंडीजवर 2-0 अशी विजयी आघाडी घेत मालिका सिलंबद केली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात विंडीजच्या गोलंदाजांना आपली षटके ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करता आली नाहीत. त्यामुळे सामन्यातील पंचांनी आपल्या अहवालामध्ये याची नोंद केली. त्यानंतर आयसीसीच्या चौकशी समितीसमोर विंडीजची कर्णधार हिली मॅथ्युजने हा गुन्हा कबूल केला. आता विंडीज संघातील प्रत्येक खेळाडूला मिळणाऱ्या मानधनातील 10 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे. रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विंडीजचा 90 धावांनी पराभव केला होता.
Advertisement
Advertisement