For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टी-20 विश्वचषकासाठी विंडीज संघाची घोषणा

06:23 AM Jan 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
टी 20 विश्वचषकासाठी विंडीज संघाची घोषणा
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली 

Advertisement

आयसीसीच्या माहितीनुसार वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी आयसीसी पुरूष टी-20 विश्वचषकसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

ही प्रतिष्ठित स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दोनवेळा टी-20 विश्वचषक विजेत्या (2012 आणि 2016) वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व अनुभवी फलंदाज शाय होप करणार आहे. 32 वर्षीय होपने डिसेंबर 2017 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. या उजव्या हाताच्या फलंदाजाने 58 सामने आणि 56 डावांमध्ये 29.22 च्या सरासरीने आणि 137.68 च्या स्टाईक रेटने 1403 धावा केल्या आहेत. होपने टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये 9 अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. अफगाणिस्तानविरुद्ध अलिकडीलटी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतून बाहेर राहिल्यानंतर होप संघात पुनरागमन करत आहे. तसेच रोस्टन चेस, जेसन होल्डर, शेरफेन रुदरफोर्ड आणि रोमॅरियो शेफर्ड हे देख्घल संघात परतले आहेत. अलिकडील तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत अफगाणिस्तानने विंडीजला 2-1 ने पराभूत केले होते. या प्रतिष्ठित स्पर्धेत उतरण्यापूर्वी अंतिम तयारीचा भाग म्हणून ते दक्षिण आफ्रिकेशी भिडतील. टी-20 विश्वचषक गट सी मध्ये असलेल्या वेस्ट इंडिजचा सामना इंग्लंड, नेपाळ, इटली आणि स्कॉटलंडशी होईल. स्पर्धेतील त्यांचा पहिला सामना 7 फेब्रुवारी रोजी ईडन गार्डन्सवर स्कॉटलंडविरुद्ध होईल.

Advertisement

वेस्ट इंडिज संघ: शाय होप (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, जेसन होल्डर, अकील होसेन, शमार जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रुदरफोर्ड, क्विंटन सॅम्पसन, जेडेन सील्स, रोमारियो शेफर्ड.

Advertisement
Tags :

.