न्यूझीलंड दौऱ्यासाठी विंडीज संघ जाहीर
वृत्तसंस्था / सेंट जोन्स
विंडीजचा क्रिकेट संघ 5 ते 13 नोव्हेंबर दरम्यान न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघात 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी क्रिकेट विंडीजने टी-20 संघाची घोषणा केली आहे. अलिकडे विंडीजच्या टी-20 संघाने बांगलादेशविरुद्धची टी-20 मालिका जिंकली होती. 2026 मध्ये होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी विंडीजला न्यूझीलंडचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. विंडीज संघामध्ये मॅथ्यु फोर्डचे पुनरागमन झाले आहे. तसेच शमार स्प्रिंगर यालाही संघात स्थान मिळाले आहे. सिमॉन्स आणि ब्लेड्स यांना मात्र दुखापतीमुळे संघातून वगळण्यात आले आहे. शाय हॉपकडे संघाचे नेतृत्व राहील.
विंडीज टी-20 संघ: शाय हॉप (कर्णधार), अथांजे, ऑगेस्टी, चेस, मॅथ्यू फोर्ड, होल्डर, अकिल हुसेन, अमिर जंगू, ब्रेन्डॉन किंग, पियेरी, आर. पॉवेल, एस. रुदरफोर्ड, सिलेस,