महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वेस्ट इंडीजची गाठ आज इंग्लंडशी

06:43 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ ग्रोस आइलेट (सेंट लुसिया)

Advertisement

वेस्ट इंडिज टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या आज गुरुवारी होणार असलेल्या पहिल्या सुपर एटच्या लढतीत आपल्या विजयी वाटचालीचा वेग वाढवण्यास उत्सुक असेल. परंतु त्यांची गाठ इंग्लंडशी पडणार असून त्यांना कमी लेखण्याची जोखीम त्यांना परवडणार नाही.

Advertisement

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. यजमान संघ आतापर्यंत स्पर्धेत अपराजित राहिलेला असून दुसरीकडे इंग्लंडची गट स्तरावरील कामगिरी खूपच चिंताजनक राहिलेली आहे. त्यामुळे जोस बटलर आणि त्याच्या खेळाडूंना आता नव्याने सुऊवात करण्याची संधी आहे.

वेस्ट इंडिजने मागील सामन्यात अफगाणिस्तानविऊद्ध जबरदस्त खेळ केला आणि ते पुन्हा एकदा अशाच निकालाच्या शोधात असतील. संघाला जेव्हा जेव्हा गरज भासली आहे तेव्हा तेव्हा त्यांच्या फलंदाजांनी, मग तो शेन रदरफोर्ड असो वा निकोलस पूरन, जबाबदारी हवी तशी पेलली आहे. त्यांच्या गोलंदाजांनीही त्यांचे काम चोख बजावले आहे. विंडीज संघातील डावखुरी फिरकी जोडी अकेल होसेन आणि गुडाकेश मोती इंग्लंडच्या फलंदाजांना सतावू शकतात. त्याशिवाय विंडीजचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज ओबेद मॅकॉयची भूमिकाही महत्त्वाची ठरेल. इंग्लंडचे वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड हे देखील प्रभाव पाडण्यास उत्सुक असतील.

 सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वा.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article