For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विंडीजची द.आफ्रिकेवर 6 धावांनी मात

06:17 AM Feb 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
विंडीजची द आफ्रिकेवर 6 धावांनी मात
Advertisement

सामनावीर मोतीचे 3 बळी, डी कॉक मालिकावीर, द.आफ्रिकेचा मालिकाविजय

Advertisement

वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग, द.आफ्रिका

पावसाचा व्यत्यय आलेल्या तिसऱ्या व अखेरच्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडीजने यजमान दक्षिण आफ्रिकेचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे 6 धावांनी पराभव केला. 17 धावांत 3 बळी मिळविणाऱ्या विंडीजच्या गुडाकेश मोतीला सामनावीर तर मालिकेत 143 धावा करणाऱ्या क्विन्टन डी कॉकला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. ही मालिका द.आफ्रिकेने 2-1 अशा फरकाने जिंकली.

Advertisement

पावसाचा वारंवार अडथळा आल्याने ही लढत प्रत्येकी 10 षटकांचा खेळविण्याचा निर्णय पंचांनी घेतला. या सामन्याला प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रथम फलंदाजी मिळाल्यावर विंडीज 10 षटकांत 3 बाद 114 धावा जमविल्या. शिमरॉन हेटमायर व शाय होप यांनी प्रत्येकी 48 धावा फटकावल्या.  त्यानंतर द.आफ्रिकेला 10 षटकांत 125 धावांची सुधारित उद्दिष्ट देण्यात आले. पण त्यांना 10 षटकांत 6 बाद 118 धावा जमविता आल्या. क्विन्टन डी कॉकने जोरदार फटकेबाजी केली. पण 28 धावांवर त्याला मोतीने बाद केले. देवाल्ड ब्रेविस व रिकेल्टन यांनी आक्रमक भागीदारी केली. पण मोतीने एकाच षटकात या दोघांना बाद केले. द.आफ्रिकेला शेवटच्या 4 षटकांत 62 धावांची गरज होती. जेसन स्मिथ व ट्रिस्टन स्टब्स यांनी फटकेबाजी करीत प्रयत्न केले. विंडीजने अखेरच्या टप्प्यात संयम राखत अचूक मारा केला. शमार जोसेफने अखेरच्या षटकात स्मिथला यॉर्करवर बाद करून द.आफ्रिकेला 6 बाद 118 धावांवर रोखत विजय साकार केला.

संक्षिप्त धावफलक : विंडीज 10 षटकांत 3 बाद 114 : शाय होप 25 चेंडूत 3 चौकार, 4 षटकारांसह 48, हेटमायर 22 चेंडूत 1 चौकार, 6 षटकारांसह नाबाद 48, रोवमन पॉवेल 13. एन्गिडी 1-19, केशव महाराज 1-38, मफाका 1-12.

द.आफ्रिका 10 षटकांत 6 बाद 118 : डी कॉक 14 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 28, ब्रेव्हिस 10 चेंडूत 17, लिन्डे 9 चेंडूत 17, रिकेल्टन 7 चेंडूत 15, जेसन स्मिथ 10 चेंडूत 26, स्टब्स 5 चेंडूत नाबाद 10. गुडाकेश मोती 3-17, शमार जोसेफ 1-23, जेसन होल्डर 1-30, अकील हुसेन 1-25.

Advertisement
Tags :

.