वेस्ट इंडिजचा फडशा
महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने 13 षटकातच सामना खिशात टाकून मोठ्या दिमाखाने अंतिम फेरीत प्रवेश केला. 8 खेळाडू राखून ऑस्ट्रेलियाने विजय नोंदवीला.प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघ चाचपडताना दिसला. टप्पा टप्प्याने खेळाडू गमावल्याने संघ भक्कम धावसंख्या उभारू शकला नाही. विशेष म्हणजे एकही फलंदाज अर्ध शतक नोंदवू शकली नाही. मॅथ्यूस (30) केम्पबेल (22) डॉटीन (26) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू ऑस्ट्रेलियाच्या अचूक आणि भेदक माऱ्यापुढे वेस्ट इंडिज संघ टिकाव धरू न शकल्याने 125 धावात गारद झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
ऑस्ट्रेलिया कडून मुनी आणि गार्डनर यांनी अतिशय जबाबदारी आणि चिकाटीने फलंदाजी केली. भरवशाची एलीस पेरी जखमी झाली तरीही तिची उणीव या जोडीने भासून दिली नाही.मुनीने खणखणीत 8 चौकार ठोकून 36 चेंडूत 61 धावा केल्या. गार्डनरने 1 षटकार 4 चौकारासह 20 चेंडूत 35 धावा नोंदविल्या.
परिणामी ऑस्ट्रेलियाने 13 षटकातच विजय नोंदवून टी-20 विश्वचषक स्पर्धेत
दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला.ऐशली गार्डनरला प्लेअर ऑफ द मॅच घोषित करण्यात आले.