विंडीज-ऑस्ट्रेलिया महिलांच्या मालिकेचे आयोजन
वृत्तसंस्था/ सेंट जॉन्स, अँटिग्वा-बर्बुडा
मार्च-एप्रिलमध्ये वेस्ट इंडीजमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिलांची सहा सामन्यांची व्हाईटबॉल मालिका होणार असल्याचे क्रिकेट वेस्ट इंडीजने जाहीर केले. यातील सामने सेंट व्हिन्सेंट ग्रेनाडा, सेंट किट्स-नेव्हिस येथे होणार आहेत. या मालिकेत आधी विंडीज व ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना घेण्याचे ठरले होते. 2004 नंतर प्रथमच व 1979 नंतर दुसरी कसोटी घेण्याचे ठरविण्यात आले होते. पण आता त्यात बदल करण्यात आला असून तीन टी-20 सामने सेंट व्हिन्सेंट येथे मार्च 19, 21, 23 रोजी तर तीन वनडे सामने सेंट किट्स येथे मार्च 27, 29 एप्रिल 2 रोजी होणार आहेत. दोन्ही संघांतील या मालिका चुरशीच्या होतील, अशी अपेक्षा केली जात आहेत. इंग्लंडमध्ये महिलांची टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा काही महिन्यांवर आली असल्याने प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव व प्रत्येक बळी हा महत्त्वाचा ठरणार आहे.
जागतिक क्रमवारीत ऑस्ट्रेलियन महिला संघ सध्या अग्रस्थानी असून विंडीज संघ टी-20 मध्ये पाचव्या तर वनडेमध्ये नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांत वर्चस्वासाठी संघर्ष होण्याची अपेक्षा आहे. वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टिकोनातूनही या मालिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या विंडीज महिलांची लंकेविरुद्ध ग्रेनाडा येथे मालिका सुरू आहे.
विंडीज-ऑस्ट्रेलिया महिलांच्या मालिकेचे वेळापत्रक
टी-20 आंतरराष्ट्रीय सामने, सेंट व्हिन्सेंट
पहिला सामना 19 मार्च
दुसरा सामना 21 मार्च
तिसरा सामना 23 मार्च
वनडे आंतरराष्ट्रीय मालिका, सेंट किट्स
पहिला सामना 27 मार्च
दुसरा सामना 29 मार्च
तिसरा सामना 2 एप्रिल.