For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Suvendu Adhikari In Iskcon प. बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी केले इस्कॉनमध्ये गोपूजन...

02:39 PM May 28, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
suvendu adhikari in iskcon प  बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी केले इस्कॉनमध्ये गोपूजन
Advertisement

नव्याने स्थापन झालेल्या भाजप सरकारने पश्चिम बंगालमध्ये धडाक्याने निर्णय घेतल्याने चर्चेत आलेले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी इस्कॉन मायापूर येथे गोपूजा संपन्न केली. गुरुवारी मुख्यमंत्री अधिकारी यांनी नादिया जिल्ह्यातील मायापूर येथे भेट दिली.

Advertisement

एएनआयच्या वृत्तानुसार अधिकारी म्हणाले, पदभार स्वीकारल्यानंतर सुरु असलेल्या अध्यात्मिक कार्याचा भाग म्हणूनच त्यांनी मंदिराला भेट दिली आणि पूजा संपन्न केली. शपथ घेतल्यानंतर मी अनेक मंदिरांना भेट दिली शिवाय मला इस्कॉनच्या मायापूरमधील मंदिरालाही भेट द्यायची होती.

इस्कॉनकडून स्वागत

Advertisement

याप्रसंगी इस्कॉनचे विश्वस्त आणि संचार संचालक युधिष्टिर गोविंद दास यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले आणि संस्थेशी त्यांच्या असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांविषयी चर्चा केली.  दास म्हणाले "मुख्यमंत्री अधिकारी हे बऱ्याच काळापासून संस्थेच हितचिंतक आणि भक्त आहेत,मुख्यमंत्री झाल्यानंतर एकाच महिन्याच्या आत ते संस्थेत आले आणि त्यांनी आम्हाला भेट दिली याचा आम्हाला आनंद होत आहे.

सीमा सुरक्षेबाबत गंभीर

संरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री अधिकारी म्हणाले, "सध्या बीएसएफ चौक्या आणि तारांचे कुंपण उभारण्यास मदत करुन सरकारने सीमासुरक्षेकडे अत्यंत गांभीर्याने पाहायला सुरुवात केली आहे, सीमा सुरक्षा दलाकडे आता अतिरिक्त जमीन सुपूर्द करण्यात आली असून आता एकूण जमीनीचे क्षेत्र हे १४२.७९ इतके झाले आहे"

मिळालेल्या माहितीनुसार सीमा सुरक्षा उपक्रमांतर्गत पश्चिम बंगालमधल्या ९ जिल्ह्यात जमीनींचे वाटप याआधीच पूर्ण झाले आहे.

Advertisement
Tags :

.