For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गॅरंटी योजनांमुळे गरिबांचे कल्याण

10:52 AM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
गॅरंटी योजनांमुळे गरिबांचे कल्याण
Advertisement

मंत्री हेब्बाळकर : कंग्राळी खुर्द येथे प्रचार

Advertisement

बेळगाव : राज्य सरकारकडून महिला सबलीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. गृहलक्ष्मी, शक्ती, अन्नभाग्य, गृहज्योती, युवा निधी अशा योजना राबवून गोरगरिबांचे कल्याण साधण्यात आले आहे. गृहलक्ष्मी योजनेमुळे अनेक महिलांना आर्थिक पाठबळ मिळाले आहे. यासाठी मतदारांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देऊन मृणाल हेब्बाळकर यांना विजयी करावे, असे आवाहन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. बेळगाव ग्रामीण मतदारसंघात येणाऱ्या कंग्राळी के. एच. येथे आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या. राज्य सरकारकडून नेहमीच शेतकरी, गोरगरिबांना साथ देण्यात आली आहे. त्यांच्या विकासावर भर देण्यात आला आहे. यासाठीच पाच गॅरंटी योजना राबवून त्यांची समर्पकपणे अंमलबजावणी केली जात आहे. काँग्रेस पक्ष केंद्रात सत्तेवर आल्यास आणखी 25 गॅरंटी योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी मतदारांनी काँग्रेसला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी लता पाटील, बाळाराम पाटील, ज्योती पाटील, वीणा मुतगेकर, मनोहर पाटील, सुधीर पाटील, राधा कांबळे, केंपान्ना एस., मोहन पाटील, आनंद बजंत्री आदी उपस्थित होते. यानंतर त्यांनी कंग्राळी बी. के. येथे प्रचार केला. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष कौसरजहा सैय्यद, जयराम पाटील, दत्ता पाटील, उमेश पाटील, मेनका कुऱ्हाडे, शकुंतला सिंग, वेदिका पठाणी, गायत्री पाटील आदी उपस्थित होते. दक्षिण मतदारसंघात येणाऱ्या शहापूर-गाडेमार्ग, सिद्धार्थ कॉलनी आदी ठिकाणी प्रचार केला.

Advertisement
Advertisement
Tags :

.