महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वारगांवचे माजी सरपंच एकनाथ कोकाटे स्वगृही

04:35 PM Nov 15, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत

Advertisement

कणकवली /प्रतिनिधी
वारगांव गावचे माजी सरपंच एकनाथ कोकाटे व त्यांचे बंधू शैलेश कोकाटे भाजप स्वगृही परतले आहेत. आमदार नितेश राणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. विकास होईल म्हणून उबाठामध्ये गेलो. मात्र खोटी आश्वासने आणि फसवणूक या पलीकडे काहीही मिळाले नाही. असे कोकाटे यांनी सांगितले.भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करताना आमदार नितेश राणे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी अतिशय समर्पितपणे काम केले आहे. त्यांनी रस्ते, वीज, पाणी अशा मुलभूत सुविधांचा विकास केला, ज्यामुळे मतदारसंघातील नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक नवीन रस्ते बांधले गेले असून, वीज आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असे कोकाटे यांनी सांगितले.यावेळी उपस्थित संतोष कानडे, दिलीप तळेकर मिलिंद मेस्त्री, संतोष पारकर, शिरसाट बुवा, उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article