For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जनतेच्या निर्णयाचे स्वागत

11:08 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
जनतेच्या निर्णयाचे स्वागत
Advertisement

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : खासदार शेट्टर यांना शुभेच्छा

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी दिलेल्या निकालाचा अत्यंत नम्रपणे स्वीकार करून नूतन खासदार जगदीश शेट्टर यांचे अभिनंदन करते, असे महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या पक्षातर्फे काम केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना, समर्थक मतदारांना, तसेच सहकार्य केलेल्या वृत्तमाध्यम प्रतिनिधींचे आभार मानते, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, तसेच जिल्ह्यातील विद्यमान आणि माजी आमदार, पक्षाचे नेते यांनी मोठे सहकार्य केले आहे. या सर्वांचे आपण कृतज्ञ आहोत. मृणाल हेब्बाळकर हे वयाने लहान आहेत. राजकारणामध्ये त्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. भविष्यामध्ये उत्तम संधी आहे. ही एक तत्कालीक पिछेहाट आहे.

मतदारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन सहकार्य केले आहे. असे असले तरी निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीचे आत्मपरीक्षण केले जाईल. झालेल्या चुकांची भविष्यात सुधारणा करून पुढे जाऊ. पक्षाच्या बाजूने समर्थपणे उभे राहून कार्य केलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या बाजूने समर्थपणे उभे राहणार आहे. जिल्ह्यातील सुख-दु:खात सहभागी होऊन पक्ष बळकट करण्याच्यादृष्टीने काम करू, असे त्यांनी सांगितले. नूतन खासदार म्हणून निवडून आलेले जगदीश शेट्टर यांचे अभिनंदन करून भविष्यामध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक प्रयत्न करावेत, अशा शुभेच्छा देऊन राज्यात आपले सरकार असून जिल्ह्याच्या विकासासाठी नवनवीन योजना आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्याचा विकास साधण्यात येईल. जनतेचा विश्वास संपादन करून वाटचाल केली जाईल, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.