For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

26 जूनला झळकणार ‘वेलकम टू द जंगल’

07:00 AM Jun 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
26 जूनला झळकणार ‘वेलकम टू द जंगल’
Advertisement

अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स, ड्रामा आणि सस्पेंसने भरपूर अन् बॉलिवूड कलाकारांची फौज असलेला चित्रपट ‘वेलकम टू द जंगल“चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये अफरातफरी आणि नॉनस्टॉप एंटरटेन्मेंटसोबत फुल-फॅमिली एंटरटेन्मेंट देखील आहे. या ट्रेलरमध्ये कॉमेडी, रोमांच, मस्ती, ड्रामा यासारख्या गोष्टी प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडणाऱ्या आहेत. या ट्रेलरमध्ये चित्रपटातील प्रत्येक पात्राला चमकण्याची संधी देण्यात आली असून यात अक्षय कुमार, परेश रावल, राजपाल यादव, रविना टंडन,  सुनील शेट्टी,  लारा दत्ता, फरीदा जलाल, जॅकी श्रॉफ यासारख्या कलाकारांची मजेशीर झलक आहे.

Advertisement

वेलकम टू द जंगल हा चित्रपट 26 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ‘वेलकम“ फ्रेंचाइजीचा तिसरा भाग असून याचे दिग्दर्शन अहमद खानने केले आहे. चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे, त्याच्यासोबत सुनील शेट्टी, अरशद वारसी, दिशा पाटनी, जॅकलीन फर्नांडिस, रविना टंडन, लारा दत्ता, जॅकी श्रॉफ, उर्वशी रौतेला, परेश रावल, जॉनी लीवर, राजपाल यादव, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, कृष्णा अभिषेक, कीकू शारदा, दलेर मेहंदी दिसून येणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.