For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हुबळी-पुणे वंदे भारतचे डॉ. किरण ठाकुर यांच्याकडून स्वागत

11:22 AM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
हुबळी पुणे वंदे भारतचे डॉ  किरण ठाकुर यांच्याकडून स्वागत
Advertisement

रेल्वे चालक-प्रवाशांना मिठाई भरवून साजरा केला आनंद : सातत्याचा पाठपुरावा-सर्वांच्या प्रयत्नांचे फलित

Advertisement

बेळगाव : पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसच्या बुधवारी झालेल्या पहिल्या फेरीचे बेळगावमध्ये जल्लोषी स्वागत करण्यात आले. ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांनी ही रेल्वे सुरू होण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन सातत्याने पाठपुरावा केला होता. बेळगावच्या लोकप्रतिनिधींनीसुद्धा त्यासाठी प्रयत्न केले होते. या सर्वांच्या प्रयत्नांचे फलित म्हणून सध्या आठवड्यातून तीन दिवस ही रेल्वेसेवा सुरू झाली आहे.या रेल्वेमुळे बेळगावहून पुण्याला अवघ्या साडेसहा तासात पोहोचता येणार आहे. अनेक व्यावसायिक, उद्योजकांची या रेल्वेमुळे सोय झाली आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या वेळेची बचत होणार आहे. त्यामुळे याचा विशेष आनंद व्यक्त करताना

डॉ.किरण ठाकुर यांच्यातर्फे सोमवारी उद्घाटनाच्या दिवशी पेढे वितरित करण्यात आले होते. बुधवारी सकाळी डॉ. किरण ठाकुर स्वत: रेल्वे स्थानकात दाखल झाले, आणि त्यांनी वंदे भारतच्या चालकांचा पुष्पहार अर्पण करून त्यांना पेढा भरवून सत्कार केला. या रेल्वेतून प्रवासासाठी उपस्थित प्रवासी आणि अन्य रेल्वेतून आलेले प्रवासी या सर्वांनाच ‘तरुण भारत’ व लोकमान्य को-ऑप. सोसायटी परिवारतर्फे डॉ. किरण ठाकुर यांनी पेढे दिले. या अनपेक्षित स्वागतामुळे चालक भारावून गेले तर प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. याप्रसंगी रेल्वेचे अधिकारी ए. बी. प्रकाशम व प्रकाश गस्ती, शिवप्रतिष्ठानचे जिल्हा प्रमुख किरण गावडे, लोकमान्य सोसायटीचे डॉ. दामोदर वागळे यांच्यासह सर्व संचालक, शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते, उष:काल मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Advertisement

वाढत्या प्रतिसादानंतर रोज

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे माहिती व जनसंपर्क खात्याचेही मंत्री आहेत. इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच अध्यक्ष राकेश शर्मा यांच्या समवेत त्यांची भेट घेऊन त्यांना वृत्तपत्र समुहाच्या अडचणींबद्दल माहिती देऊन चर्चा केली होती. याचवेळी पुणे-बेळगाव वंदे भारत सुरू करावी, असे निवेदन दिले होते. केंद्रीय मंत्र्यांनी त्याची त्वरित नोंद घेतली व सर्व माहितीही जाणून घेतली, आणि बुधवारपासून वंदे भारत सुरूही झाली. अनेक वर्षांच्या या मागणीला आता यश आले आहे. सध्या आठवड्यातून फक्त तीन दिवस ही रेल्वेसेवा सुरू आहे. मात्र, बेळगावहून वंदे भारतला वाढता प्रतिसाद मिळणार आहे, याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे पूर्ण आठवडा ही रेल्वे सुरू व्हावी यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत.

-डॉ. किरण ठाकुर, समूहप्रमुख व सल्लागार संपादक, तरुण भारत; चेअरमन, लोकमान्य सोसायटी

Advertisement
Tags :

.