For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंत्री फळदेसाई, आमदार डिकॉस्तांकडून स्वागत

06:11 AM Aug 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
मंत्री फळदेसाई  आमदार डिकॉस्तांकडून स्वागत
Advertisement

एसटी राजकीय आरक्षण : पक्ष देईल त्या उमेदवाराकरिता कार्य करणार

Advertisement

त. भा. वार्ताहर

केपे : गोव्यात राजकीय आरक्षणासाठी एसटी बांधव गेल्या अनेक वर्षापासून करत असलेला संघर्ष शेवटी संपला असून केंद्र सरकारने त्याच्या अंमलबजावणीसाठीची अधिसूचना जारी केली आहे. राजकीय आरक्षणास अनुसरून सांगे व केपे हे मतदारसंघ राखीव होतील असा अंदाज लावला जात असून सांगेचे आमदार व समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई व केपेंचे आमदार अॅल्टन डिकॉस्ता या दोन्ही नेत्यांनी दोन्ही आरक्षणाचे स्वागत केले आहे.

Advertisement

मतदारसंघ राखीव झाल्यास पक्ष जो उमदेवार देईल त्याच्याकरिता काम करू व पक्ष जी जबाबदारी देईल ते कार्य करू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे . ‘उटा’ संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनीही राजकीय आरक्षणाचे स्वागत केले आहे.

भाजपमुळेच एसटी दर्जा 2003 मधे मिळाला होता आणि आता राजकीय आरक्षणाची मागणीही भाजपने पूर्ण केली आहे. मी जरी सांगेचा आमदार असलो, तरीही या निर्णयाचे स्वागत करतो. जर एसटी समाजावर अन्याय होत असेल, तर त्याला न्याय देण्यासारखे नेतृत्व व आमदार मिळायला पाहिजे. तेव्हाच  सर्वांगीण विकास होऊ शकेल, असे मंत्री फळदेसाई म्हणाले.

...तर एसटी उमेदवारासाठी प्रयत्न करू : डिकॉस्ता

सर्व एसटी बांधवांना शुभेच्छा. कारण अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर राजकीय आरक्षणाची मागणी पूर्ण होत आहे. एसटींच्या हक्कांकरिता दोन बांधवांनी बलिदान दिले होते. त्यांचे हक्क आज त्यांना मिळत आहेत. गेली साडेचार वर्षे मला केपेतील एसटी बांधवांकरिता कार्य करायला मिळाले यार्चा मला अभिमान आहे. केपें मतदारसंघ राखीव झाल्यास एसटी बांधवांमधील काँग्रेस उमेदवार निवडून आणण्याकरिता प्रयत्न करू, असे आमदार डिकॉस्ता यांनी सांगितले. तसेच पक्षाने सांगितल्यास अन्य मतदारसंघात निवडणूक लढविण्यास मी तयार आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारली जाईल, असे त्यांनी सागितले.

जनगणनेवरून राखीव मतदारसंघ ठरतील : वेळीप

केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार जे अधिकार मिळायला पाहिजेत ते आता या सरकारच्या कार्यकाळात मिळतील. 13 रोजी महामेळावा आयोजित केला होता. त्यापूर्वी अधिसूचना जारी करण्यात आल्याबद्दल आपण धन्यवाद देतो. कोणते मतदारसंघ राखीव होतील ते जनगणनेनुसार ठरेल व ते निवडणूक आयोग ठरवेल, असे प्रकाश वेळीप यांनी सागितले.

Advertisement
Tags :

.