आशियाई स्पर्धेसाठी वेटलिफ्टिंग संघ जाहीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑलिम्पिक पदकविजेती आणि माजी विश्वविजेती मीराबाई चानू जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय वेटलिफ्टिंग संघाचे नेतृत्व करेल. यासाठी पाच सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला.
जपानमध्ये 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत आशियाई क्रीडा स्पर्धा होणार असून त्यातील वेटलिफ्टिंग स्पर्धा 22 ते 28 सप्टेंबर दरम्यान टोकाई सिटिझन्स जिम्नॅशियममध्ये होईल. मीराबाई चानू महिलांच्या 49 किलो वजनी गटात सहभागी होईल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपले पहिले पदक जिंकण्याचा प्रयत्न करेल. यापूर्वी हांगझोऊ 2023 स्पर्धेत ती पदकापासून थोडक्यात हुकली होती आणि चौथ्या स्थानावर राहिली होती. जाहीर झालेल्या संघात तीन महिला व एका पुरुष वेटलिफ्टरचा समावेश आहे.
भारतीय वेटलिफ्टिंग संघ : मीराबाई चानू (महिला 49 किलो), ज्ञानेश्वरी यादव (महिला 53 किलो ), सेराम निरुपमा देवी (महिला 61 किलो), हरजिंदर कौर (महिला 69 किलो), ऋषिंकात सिंग चानंबम (पुरुष 60 किलो).