महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वेई-झिलेनस्की मिश्र दुहेरीत विजेते

06:39 AM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/लंडन

Advertisement

2024 च्या विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत तैवानची हेस वेई आणि पोलंडच्या झिलेनस्की यांनी मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविताना मेक्सिकोच्या गोंझालेझ आणि ओलमोस यांचा सरळ सेटस्मध्ये पराभव केला.

Advertisement

2024 च्या टेनिस हंगामातील वेई आणि झिलेनस्की यांचे ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेतील दुसरे विजेतेपद आहे. गेल्या जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलिया ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत त्यांनी मिश्ा़dर दुहेरीचे जेतेपद पटकाविले होते. विम्बल्डन स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात वेई व झिलेनस्की यांनी गोंझालेझ व ओलमोस यांचा 6-4, 6-2 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. हा अंतिम सामना 76 मिनीटे चालला होता. तैवानच्या हेसचे विम्बल्डन स्पर्धेतील हे पाचवे विजेतेपद आहे. हेसने यापूर्वी 2013, 2019, 2021 आणि 2023 साली महिला दुहेरीचे अजिंक्यपद मिळविले होते. त्यामुळे तीने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत दुहेरीची 9 अजिंक्पदे मिळविली आहेत.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media#sports
Next Article