दसरा-दिवाळीसाठी रेल्वेची साप्ताहिक एक्स्प्रेस
यशवंतपूर-पंढरपूर मार्गावर एकूण 8 फेऱ्या
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
दसरा, दिवाळी निमित्ताने नैऋत्य रेल्वेच्यावतीने यशवंतपूर-पंढरपूर मार्गावर साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे. या एक्स्प्रेसच्या एकूण 8 फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे बेळगावमधील नागरिकांना पंढरपूरला जाण्यासोबत बेंगळूरसाठी एक अतिरिक्त रेल्वे उपलब्ध होणार आहे.
यशवंतपूर-पंढरपूर एक्स्प्रेस सायंकाळी 6.15 वाजता 7 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक बुधवारी निघणार आहे. गुरुवारी सकाळी 11.35 वाजता पंढरपूर येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात 18 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक गुरुवारी दुपारी 1.35 वाजता पंढरपूर येथून निघून दुसऱ्या दिवशी पहाटे 4.15 वाजता पंढरपूर येथे पोहोचणार आहे.
या रेल्वेला सांगोला, जत रोड, कवठेमहांकाळ, अरग, मिरज, रायबाग, घटप्रभा, गोकाक रोड, बेळगाव, लोंढा, धारवाड, हुबळी यासह इतर थांबे देण्यात आले आहेत. एकूण 21 डबे असून प्रवाशांनी या रेल्वेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.