महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेत आठवडी बाजाराचे आयोजन

10:43 AM Jan 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : खरेदी-विक्री, नफा-तोटा या संकल्पनेचे मुलांना प्रत्यक्षात ज्ञान व्हावे या उद्देशाने कॅन्टोन्मेंट प्राथमिक शाळेमध्ये आठवडी बाजाराचे आयोजन केले होते. या उपक्रमात शाळेतील पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळे, खाऊचे पदार्थ इत्यादी वस्तू आणून मोठ्या प्रमाणावर विक्री केली. सर्व पालकांना आपल्या घरातील भाजीपाला एक दिवस या विद्यार्थ्यांकडून खरेदी करून मुलांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत खरेदीदार म्हणून शाळेचे पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलचे आरएमओ डॉ. रवींद्र अनगोळ, डॉ. राजश्री अनगोळ, जायंट्स सखीच्या सुलक्षणा शिंदोळकर, फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, श्रीकांत कदम यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. सुलक्षणा शिंदोळकर यांनी शालेय ग्रंथालयासाठी आठ हजाराची पुस्तके भेट दिल्याबद्दल शाळेच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन त्यांची व उपस्थित पाहुण्यांची कृतज्ञता व्यक्त केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ राजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक पी. एस. बिर्जे, यू. एस. पाटील, डी. ए. कुरणे, श्रीकांत काटकर, मनीषा वड्डगोळ, तुषार कांबळे, राहुल कांबळे, रेणुका बागडी या शिक्षकांनी परिश्र्रम घेतले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article