बंगळूरू कॅन्ट-मडगाव जंक्शन वीकेंड स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय
मडगाव : वीकेंडच्या सुट्टीमुळे होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी खालील विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या गाड्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे: गाडी क्र. ०६५९७/०६५९८ बंगळूरू कॅन्ट-मडगाव जंक्शन-बंगळूरू कॅन्ट एक्सप्रेस स्पेशल : गाडी क्र. ०६५९७ बंगळूरू कॅन्ट-मडगाव जंक्शन एक्सप्रेस स्पेशल ही गाडी (गुरुवार) १ ऑ क्टोबर रोजी बंगळूरू कॅन्ट येवून रात्री ११:५० वा. सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी ६:१० वा. मडगाव जंक्शन येथे पोहोचेल. गाडी क्र. ०६५९८ मडगाव जंक्शन-बंगळूरू कॅन्ट एक्सप्रेस स्पेशल ही गाडी मडगाव जंक्शन येवून रविवार ४ रोजी सकाळी ८.४० वा. सुटेल व त्याच दिवशी रात्री ११.५५ वा. बेंगळुरु कॅन्टला पोहोचेल.
या गाड्या सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल बेंगळुरू, चिक बनवर, कुनिगल, चन्नरायपटना, सकलेशपूर, हसन, सुब्रह्मण्य रोड, कबाकापुत्तूर, बंटवाला, सुरथकल, मुल्की, उडुपी, बरकुर, कुंदापुरा, मुकांबिका रोड ब्यंदूर, गोकर्ण रोड, अंकोला, कारवार आणि काणकोण स्टेशनवर थांबा घेईल.
गाड्याची रचना : एकूण २३ डबे, २ टियर एसी-०१ डबा, ३ टियर एसी-०३ डबे, स्लीपर-१० डबे, जनरल-०७ डबे, एसएलआर /डी-०२. गाडी क्रमांक ०६५९८ साठी आरक्षण ३० सप्टेंबर रोजी सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली इंटरनेट आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर आज सुरू होईल. वरील गाड्यांचे सविस्तर थांबे आणि वेळापत्रकासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov. in या संकेतस्थळाला भेट द्यावी.